corona
corona 
मुंबई

चिंता वाढली! मुंबईत रुग्णांचा आकडा 35 हजारांच्या पार..आज एकूण 'इतके' रुग्ण.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हजारच्या खाली येण्यास तयार नाहीये. आज मुंबईच्या कोरोना रुग्णांनी तब्बल ३५ हजारांचा आकडा पार केला आहे. आज शहरात 1438 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 35,273 झाली आहे. तर आज  38 जणांचा मृत्यू झाला असून  मृतांची एकूण संख्या 1135 झाली  आहे.                          

मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. आज 763 रुग्ण बरे झाले असून बरे होऊन सुखरूप घरी गेलेल्यांची संख्या 9917 झाली आहे.                    

मुंबईत आज 38 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 1135 वर पोचला आहे. आज झालेल्या 38 मृत्यूंपैकी 24 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 19 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी तिघांचे वय 40 च्या खाली होते. तर 12 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. तर 17 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.        

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 839 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 28,554 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 763 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 9817 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

corona patients in mumbai crosses 35 thousand mark

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT