मुंबई

महाभयंकर ! पुढच्या ३ महिन्यात कोरोनाचा हाहाकार वाढणार? तब्बल 'इतके' लाख रुग्ण...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  कोरोनामुळे देश २ महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. शेकडो लोकं आपल्या घरापासून दूर आहेत काहींना तर हजारो किलोमीटरचं अंतर पायी पार करावं लागतंय. कोरोनामुळे देशावर महाभयंकर संकट कोसळलं आहे. मात्र हे संकट लवकर जाईल अशी चिन्हं दिसत नाहीयेत. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनाच्या रुग्णांमध्ये भयंकर वाढ होणार आहे अशी लक्षणं दिसत आहेत.

केंद्र सरकारकडून नुकतीच लॉकडाऊन-४ ची घोषणा करण्यात आली आहे. यात लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव बघता आपली कोरोनातून लगेच सुटका होईल अशी चिन्हं दिसत नाहीयेत. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ होत चालली आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा एक दोन लाख नाही तर त्याच्याही पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ५ हजार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुढचे २ ते ३ महिने भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत देशात तब्बल १० लाख कोरोनाग्रस्त रुग्ण असतील अशी चिंता तज्ज्ञांनी  व्यक्त केली आहे. 

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सरकारनंही तयारी सुरू केली आहे. जुलैपर्यंत तब्बल १ कोटी लोकांच्या टेस्ट करण्याचं टार्गेट सरकारकडून आखण्यात आलं आहे. तसंच बेड्सची उपलब्धता, त्यांच्यासाठी लागणारी उपकरणं, मनुष्यबळ, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण अशा सर्व गोष्टींची तयारी करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढतायेत: 

देशात होणाऱ्या एकूण कोरोनाच्या चाचण्यांमध्ये ४.३ टक्के लोकं पॉझिटिव्ह निघत आहेत. मात्र  महाराष्ट्रात हा आकडा तब्बल ११.०९  टक्के इतका आहे. म्हणजेच प्रत्येक १०० चाचण्या केल्यानंतर राज्यात १२ जण पॉझिटिव्ह येत आहेत.

प्रशासन होतंय सज्ज: 

या महाभयंकर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडून व्यवस्था वाढवण्यात येणार आहे. सरकारनं यासाठी २० मोठ्या शहरांची निवड केली आहे. या सर्व शहरांमध्ये चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. मुंबईतही कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात येणार आहे . 

corona patients will increase around 10 lacs till august read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT