Navratri  sakal media
मुंबई

नवारात्रौत्सवात यंदाही गरबा आयोजनावर बंदी; गर्दी न करण्याचे BMC चे आवाहन

समीर सुर्वे

मुंबई : गणपती प्रमाणेच नवरात्रौत्सवावरही (Navratri Festival) कोविडचे सावट (corona) असल्याने यंदाही गरबा, दांडियांच्या अयोजनावर बंदी आहे. तसेच, आरती, भजन, किर्तनासाठीही गर्दी न जमविण्याचे (no crowd) आवाहन महानगरपालिकेने (BMC) केले असून सार्वजनिक मंडळांनी देवीची मुर्ती चार फुटांची आणि घरगुती दोन फुट उंचीच्या मुर्तीचे प्रतिष्ठापना करण्याचा नियम करण्यात आला आहे.

महानगर पालिकेने आज या नियमावलीचे परीपत्रक प्रसिध्द केले आहे.त्यानुसार सार्वजनिक मंडळांनी महानगर पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे.7 ऑक्‍टोबर रोजी घटस्थापना होत आहे.परवानगी घेऊनच उत्सव साजारा करण्याचे आवाहन महानगर पालिकेने केले आहे.तसेच,कोविडच्या पार्श्‍वभुमीवर उत्सव साधे पणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासन केले आहे."कोविडच्या पार्श्‍वभुमीवर नियमावली तयार करण्यात आली असल्याचे' पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी सांगितले.

- दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्यावी.

- देवी आगमनाला पाच जणांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थीती नसावी. तसेच विसर्जनाला 10 पेक्षा जास्त कार्यकर्ते नसावे. यांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेऊन किमान 15 दिवस पुर्ण झालेले असावे.तसेच विसर्जन स्थळी मुर्ती महापालिकेच्या मुर्ती दान केंद्रात अर्पण करावी.

- घरगुती उत्सव साजरा करताना शक्‍यतो शाडूच्या मातीची धातूची आणि दगडी मुर्तीचे प्रतिष्टापना करावी.त्या मुर्तीचे विसर्जन घरातच करावे.

- मिरवणुक,सांस्कृतीक कार्यक्रमां ऐवजी रक्तदान,आरोग्य शिबीरांचे आयोजन करावे.

- प्रसाद वाटण्यास मनाई आहे.

- प्रतिबंधीत क्षेत्रात असलेल्या मुर्तींचे विसर्जन तेथे करावे.

- मंडप तसेच प्रामुख्याने मुख्य प्रवेश व्दाराचे नियमीत निर्जंतुकीकरण करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिमालयातील जीवघेण्या थंडीत सैनिकांनी लढलेल्या युद्धाची शौर्यगाथा ; 120 बहादूरचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस !

'साताऱ्यात बांगलादेशींची घुसखोरी वाढली, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज'; भाजप नेते सोमय्यांनी असा का केला दावा?

Latest Marathi News Live Update : 'झेडपी’ निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता

Mundhwa Land Deal: व्यवहार होणार रद्द; ४२ कोटींचा दणका; तहसीलदार येवलेवर गुन्हा दाखल, अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीविरोधातही तक्रार

आयटी इंजिनिअरला १४ कोटींना लुबाडणाऱ्या भोंदूबाबासह तिघांना अटक, दोघे फरार; मोठे अपडेट समोर

SCROLL FOR NEXT