मुंबई

Corona Virus: काळजी घ्या, कोरोनाची ही परिस्थिती जुलै 2020 सारखी

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यासाठी राज्यातील काही भागात लॉकडाऊनची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. दरम्यान, सध्याची परिस्थिती ही जुलै 2020 सारखी झाली असून आताच काळजी न घेतल्यास गेल्या वर्षातील एप्रिल महिन्यासारखी परिस्थिती होऊन रुग्णसंख्या उच्चांक गाठेल अशी चिंता राज्य टास्क फोर्स समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

नागपूर सारख्या शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या 15 ते 21 मार्चपर्यंत केला जाणार आहे. तर, कल्याण-डोंबिवलीमध्ये मध्ये ही लॉकडाऊन करण्यात आला आहे. या ठिकाणी केसेस आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, प्रतिबंधात्मक ठिकाणी कडक निर्बंध आणि नियम लावले गेले आहेत. त्यामुळे, जर आताच कडक प्रतिबंध केले नाहीत तर येत्या 15 एप्रिलपर्यंत आपण गेल्या वर्षीच्या सप्टेंबरसारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती राज्य टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. अविनाश सूपे यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून आता दोन गोष्टी करणे आवश्यक आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणे, किंवा प्रतिबंधात्मक ठिकाणी आणि जिथे जास्तीत जास्त रुग्ण असतील तर तिथे नाईट कर्फ्यू शिवाय दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला गेला पाहिजे जो योग्य ठरेल. बाजारांचा मर्यादित वेळ, सुपर स्प्रेडर कार्यक्रमांना परवानगी न देणे, लग्नांना मर्यादित लोकांनाच उपस्थिती अशी सर्व बंधणे घालणे गरजेचे आहे.  ज्येष्ठांचे लसीकरण लवकरात लवकर झाले तर मृत्यूदर कमी होईल असेही डॉ.सुपे यांनी सांगितले. 

जूनपर्यंत 80 टक्के जनता लसीकृत होणे आवश्यक 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीविषयी नागरिकांत जनजागृती करणे, मी जबाबदार मोहिमेची अंमलबजावणी करणे तसेच सर्वांना लसीकरण देणे अशा महत्वपूर्ण उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या उपाययोजनांसह येत्या जून महिन्यापर्यंत 75 ते 80 टक्के जनतेचे लसीकरण होणे आवश्यक आहे असे मत राज्य टास्क फोर्स समितीचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले आहे. 

कोरोना रुग्ण वाढीची प्रमुख कारणे

केंद्रीय आरोग्‍य पथकाने राज्यात वाढलेल्या प्रकरणांची काही महत्वाची कारणे निदर्शनास आणून दिली आहेत. त्यात स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुका, लग्न समारंभाची वाढलेली संख्या, कोरोनाचे नियम न पाळणे, एकाच ठिकाणी खूप जास्त गर्दी करणे ही प्रमुख कारणे देण्यात आली आहेत. 

जून महिन्यापर्यंत लसीकरणाचा कार्यक्रम राबवावा

तातडीने जून महिन्याच्या अखेरपर्यंत लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला गेला पाहिजे. किमान 75 टक्के लोकांना लसीकृत केले पाहिजे. तरच, राज्याला पुढील संभाव्य धोक्यांपासून वाचवू शकतो. त्यासाठी, छोट्या छोट्या नर्सिंग होममधून लसीकरण करणे, लसीकरणाचे शिबिर करायचे, अतिवयोवृद्ध किंवा विकलांग लोकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण केले गेले पाहिजे. केंद्रातर्फे लसीकरणाचा कार्यक्रम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. मुंबईतील उंच इमारतींनीही जागा घेऊन रुग्णालयांशी टाय अप करुन लसीकरण राबवले पाहिजे. लसीकरण जास्तीत जास्त झाले तर हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि गंभीर कोविड टाळता येईल.  शिवाय, मास्क घालणे आणि प्रत्येकाने लसीकृत होणे गरजेचे आहे असे राज्य टास्क फोर्स समितीचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी स्पष्ट केले आहे. 

नाशिकसह अनेक भागांत अंशतः लॉकडाऊन

नाशिकसह अनेक भागांमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दूकाने संध्याकाळी 7 च्या दरम्यान बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, 15 मार्च पर्यंत ज्यांचे लग्नासाठी रजिस्ट्रेशन झाले आहे. फक्त त्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. ठाण्यातील 16 हॉटस्पॉटमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona situation is similar July 2020 Task Force report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT