Corona 
मुंबई

पूर्ण लसीकरण झालेल्या ०.२८ टक्के जणांना पुन्हा संसर्ग

पुन्हा संसर्ग झाल्यानंतर आजाराची तीव्रताही अत्यंत कमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पूर्ण लसीकरण झालेल्या कोविड रुग्णांनाही कोरोनाची पुन्हा लागण होत असली, तरी हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दोन्ही डोस घेऊन कोरोना संसर्ग झाल्यास त्याला ब्रेक थ्रू असे म्हणतात. पालिकेच्या आकडेवारीनुसार असे ब्रेक थ्रू संसर्ग झालेले रुग्ण मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ०.२८ टक्के आहेत.

शिवाय लसीकरणामुळे कोविड संसर्गाची गंभीरता कमी होते. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करणे, हे एकमेव उद्दिष्ट असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ८८ लाखांहून अधिक आहे.

यांच्यातील ब्रेक थ्रू संसर्गाचे प्रमाण फक्त ०.२८ टक्के आहे; तर ४३ लाख नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांच्यातील ब्रेक थ्रू संसर्गाचे प्रमाण ०.६७ टक्के एवढे आहे. एक फेब्रुवारी ते सात डिसेंबरपर्यंतची ही आकडेवारी आहे.

एक डोस घेतलेल्या एक हजार नागरिकांपैकी फक्त चार जणांना ब्रेक थ्रू संसर्ग झाल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. दोन डोस घेतलेल्यांना कोरोनाच्या ब्रेक थ्रूचा संसर्गाचा धोका कमी आहे. याचा अर्थ कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. लशीमुळे आजाराच्या संसर्गाची तीव्रता कमी होते. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची किंवा आयसीयूची गरज पडत नाही.

लसीकरण पूर्ण

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर दिला आहे. अशातच मुंबईतील १९ हजारांहून अधिक सोसायट्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने लसीकरण मोहीम सुरू केली. १०० टक्के पूर्ण लसीकरण झालेल्या सोसायट्यावर पोस्टर लावण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कोविडपासून लस १०० टक्के सुरक्षितता पुरवत नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, तसेच लशीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT