corona vaccination sakal media
मुंबई

वसई : 'या' क्षेत्रातील ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित; मोहीम ठप्प

सकाळ वृत्तसेवा

विरार : एका बाजूला न्यायालय घरोघरी जाऊन लसीकरण (corona vaccination) करता येईल का ? याची चाचणी करण्यास सांगत आहे. तर दुसऱ्या बाजूला शासन रेल्वे प्रवासासाठी दोन डोस (railway permission) घेतलेल्याना मुभा देत असतानाच ज्यांना आतापर्यंत एकही लसीचा डोस मिळाला नाही त्यांनी काय करायचे ? असा प्रश्न विचारला जात आहे. वसई तालुक्यातील (vasai) पूर्वेकडे असलेल्या टीवरी ग्रामपंच्यायत (tiwari grampanchayat) क्षेत्रात लसीकरण मोहीम पूर्णपणे ठप्प (vaccination drive stops) झाली आहे. याठिकाणी १८ ते ४४ दरम्यानच्या नागरिकांना एकही लसीचा डॉस मिळालेला नाही. येथील काही नागरिकांनी १० किलोमीटर लांब असलेल्या कामण डोंगरी येथील आरोग्य केंद्रात (health center) जाऊन लस घेतली आहे. ही ग्रामपंचायत म्हणजे महापालिका क्षेत्राच्या मधोमध असली तरी याकडे ना जिल्ह्याचे लक्ष, ना पालिकेची मदत असे चित्र निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे गेले दीड वर्ष कसेतरी दिवस ढकलणाऱ्या नागरिकांना आता तरी लस मिळून दिलासा मिळेल असे वाटत असतानाच वसई पूर्वेकडील ग्रामीण भागातील ग्रामपंच्यायत असलेल्या टीवरी या जवळपास १५ ते १७ हजार लोकसंखया असलेल्या गावात मात्र लसीकरण मोहीम राबविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी झाल्याचे दिसत आहे. हे गाव म्हणजे वसई विरार महानगरपालिकेच्या मधोमध असलेले गाव आहे त्याच्या दोन्ही बाजूला महानगरपालिका क्षेत्र आहे.

६ जून पासून आतापर्यंत याठिकाणी फक्त ५० लोकांना गावात येऊन लस देण्यात आली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील यांनी सांगितले. तर १८ ते ४४ दरम्यानच्या नागरिकांना अजून लसीचा उपलब्ध झालेली नाही .या गावातील लोकांना लस घेण्यासाठी १० किलोमीटर लांब असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. त्याठिकाणी गर्दी असली कि पूर्ण दिवस तर जातोच परंतु पैशयाचाही अपव्यय होत असल्याचे उपसरपंच नूतन भोईर यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

आमच्या गावातील नागरिक कामासाठी मुंबई, ठाणे, पालघर , विरार , भाईंदर, वसई याठिकाणी जातात परंतु त्यांना अजून पहिलाच लसीचा डोस मिळाला नाही तर दुसरा डोस कसा मिळणार, म्हणजे अजून तीन महिने त्यांनी घरीच बसायचे का? असा सवाल नूतन भॊईर यांनी जिल्हा प्रशासनाला विचारला आहे . याबाबत येथील नागरिकांनी आमदार राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली आहे . तसेच या बाबत ग्रामपंचायतीने तालुका गटविकास अधिकारी, नवघर पार्थमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांना पत्र दिले आहे.

"टीवरी गावातील लोकांच्या लसीचा प्रश्न माझ्याकडे आला असून त्याबाबत मी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी बोललो असून लवकरच त्या ठिकाणी लसीकरण सुरु होईल."

- राजेश पाटील , आमदार. बोईसर.

"टीवरी गावात लवकरच लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे त्याबाबत आमदार राजेश पाटील यांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत."

-योजना जाधव, तालुका आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP AB Form Controversy: नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म पळवले, गाडीत दोन आमदार अन् जिल्हाध्यक्ष... कार्यकर्त्यांकडून गाडीचा पाठलाग, Video पाहा...

Sangli Crime News ‘दारात उंदीर का सोडलास?’ शेजाऱ्यांनी पती-पत्नीलाच चोपलं, अन्...

Latest Marathi News Live Update : आपच्या शहराध्यक्षाचा सायकल वरून येऊन निवडणुक अर्ज दाखल

New Labour Code : आता कर्मचाऱ्यांना नोकरी सोडताच मिळणार ग्रेच्युटी! नवीन कामगार कायद्यात नेमका काय बदल झाला?

स्टार प्रवाह कँडी क्रश खेळतंय का? नवी मालिका 'तुझ्या सोबतीने'ची वेळ पाहून प्रेक्षक चक्रावले; म्हणतात- अत्यंत घाईत...

SCROLL FOR NEXT