मुंबई

नागरिकांचा होळीमूड; लसीकरणाचा आकडा खालावला, लाभार्थ्यांची पाठ

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत होळीला मिळालेल्या सुट्टीमुळे लसीकरणाचा आलेख कमी झाला असून सोमवारी 11 हजार 229 एवढ्या लोकांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, लसीकरणाचे प्रमाण जवळपास तीन टक्के कमी झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 11 हजार 229 मध्ये ही जवळपास 60 वर्षावरील लोकांनीच लसीकरणासाठी हजेरी लावली. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेकडून किमान 35 ते 45 हजार लसीकरणाची नोंद होत होती.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साांगितले की, ''होळीमुळे केवळ 108 केंद्रे निम्म्या क्षमतेने काम करत होते. पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी साांगितले की, 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाचा टप्पा कमी होऊ द्यायचा नव्हता. म्हणून होळीच्या दिवशीही लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.''

होळीमुळे राज्यभरातील अनेक शहरांमध्ये सोमवारी लसीकरणाची मोहीम घेतली गेली नाही. मुंबईत, 22 रूग्णालय-लसीकरण केंद्रांनी सोमवारी ही मोहिम राबवली नाही. 
मुंबईत आतापर्यंत 10,98,081 लसीकरण झाले आहे. यापैकी 9,53,036 लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लाभार्थ्यांना कोविड 19 लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. पालिकेला येत्या काही दिवसांत लसीकरणाचे प्रमाण वाढवून 75 हजारपर्यंत पोहोचायचे आहे. त्यासाठी, खासगी रुग्णालयांचा समावेश लसीकरण केंद्र म्हणून समावेश केला जाईल. 

"आम्ही झोपडपट्ट्यांमधील केंद्रांमध्येही लसीकरण सुरु करण्याच्या प्रक्रियेत आहोत. काही दवाखान्यांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धारावीतील जनतेचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे म्हणून एका आठवड्यापूर्वी पालिकेच्या छोटा सायन केंद्रात लसीकरण केंद्र सुरु केले गेले. मात्र, या केंद्रात अजूनही लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. सोमवारी फक्त सर्वाधिक कमी 45 लोकांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, होळीमुळे सोमवारी लस दिली जातेय हे बहुतेकांना ठाऊक नसावे. मात्र 26 आणि 27 मार्चला 451 हून अधिक लाभार्थ्यांना लसीकरण केले गेले. दररोज 500 लोकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने या आरोग्य केंद्रात पाच बूथची स्थापना केली. तरीही या मोहिमेने वेग पकडलेला दिसत नाही. येथील 8 लाख लोकसंख्येपैकी जवळपास 1.07 लाख हे ज्येष्ठ नागरिक आहेत.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Vaccination Figure dropped due Holi Mood Monday

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT