corona vaccines to children
corona vaccines to children sakal media
मुंबई

सोमवारपासून 'या' वयोगटातील मुलांचे लसीकरण; पहिल्या दिवशी देणार ४ हजार डोस

भाग्यश्री भुवड

मुंबई : येत्या सोमवारपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण (corona vaccination) केले जाणार आहे. पण, या लसीकरणासाठी ऑफलाइनही रजिस्ट्रेशन (offline registration) करता येणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासह ऑफलाईन वर पालिकेकडून भर दिला जात असून पहिल्या दिवशी 4 हजार डोस (four thousand vaccines) दिले जाणार आहेत. (corona vaccination starts from Monday for teenagers four thousand dose on first day)

मुंबई महापालिकेच्या 100 शाळांतील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.  ऑनलाईन नोंदणी सह पालिकेच्या शाळांमधील एकत्र जमलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित लसीकरण केंद्रांत नेण्याची आणि परत शाळेत सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था  केली गेली आहे.

प्रत्येक झोननुसार सोय

विभाग - लसीकरण केंद्र

-ए,बी,सी,डी,ई- भायखळा रिचर्ड्स ॲड क्रुडास

-एफ उत्तर,एल,एम पुर्व,एम पश्‍चिम -सोमय्या जंम्बो कोविड केंद्र चुनाभट्टी

-एफ दक्षिण,जी दक्षिण,जी उत्तर - वरळी एनएससीआय डोम जंम्बो कोविड केंद्र

-एच पुर्व,के पुर्व,एच पश्‍चिम -बीकेसी जंम्बो कोविड केंद्र

-के पश्‍चिम,पी दक्षिण -नेस्को जंम्बो कोविड केंद्र गोरेगाव

-आर दक्षिण,पी उत्तर - मालाड जंम्बो कोविड केंद्र

-आर मध्य,आर उत्तर - दहीसर जंम्बो कोविड केंद्र

-एन,एस- क्राम्प्टन ॲन्ड ग्रीव्हस कोविड केंद्र कांजूरमार्ग

-टी -रिचर्ड्स ॲन्ड क्रुडास कोविड केंद्र मुलूंड

3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु होणार आहे. 9 लाख 22 हजार 515 मुलांची नोंद असून 9 जंबो कोविड सेंटरवर या मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुले शाळा किंवा कॉलेज मधील असून लसीकरण कोविड सेंटरवर आणण्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची असेल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. या मुलांना लसीकरणासाठी उद्यापासून कोविन अँपवर नोंदणी करता येणार आहे. तसेच प्रत्येक जंब्मो कोविड सेंटरवर 5 बुथ असून 9 जंबो कोविड सेंटरवर 250 कर्मचारी या मुलांच्या लसीकरणासाठी तैनात असणार, असेही काकाणी म्हणाले.

या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ठरवलेल्या लसीकरण केंद्रावर कोवॅक्सीन लसचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा, असे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले. त्याच बरोबर ज्या केंद्रांवर स्वतंत्र केंद्र सुरु करणे शक्य नसेल तेथे या वयोगटासाठी स्वतंत्र रांग करण्यात यावी असेही नमुद करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचार्‍यांच्या 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी देखील लसीकरण केंद्र आहे. सन 2007 वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र राहतील.

लसीकरणानंतर ताप येणे, हात दुखणे अशी सौम्‍य लक्षणे क्वचित प्रसंगी आढळून येऊ शकतात, अशा वेळी घाबरुन न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधी घ्यावीत. त्‍याचप्रमाणे इतर काही त्रास उद्भवल्‍यास नजीकच्‍या महानगरपालिका रुग्‍णालयात संपर्क साधावा. 15 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यावे तसेच सर्व पालकांनी या वयोगटातील आपापल्या पात्र पाल्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT