मुंबई

कोरोना लसीच्या चाचण्या कुठवर? केईएम आणि नायरमध्ये आतापर्यंत 20 जणांना कोव्हिशील्डचा दुसरा डोस

भाग्यश्री भुवड

मुंबई : पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात आतापर्यंत 20 जणांना कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. केईएममध्ये 99 पैकी 14 स्वयंसेवकांना आणि नायरमध्येही 6 स्वयंसेवकांना कोव्हिशील्डचा दुसरा डोस देण्यात आला आहे. अशा एकूण 20 जणांना दुसरा डोस दिला गेला आहे. 

केईएममध्ये सोमवारपासून स्वयंसेवकांना दुसरा डोस द्यायला सुरुवात करण्यात आली आहे. तर, नायरमध्ये मंगळवारपासून दुसरा डोस द्यायला सुरुवात झाली असुन आतापर्यंत 6 जणांना यशस्वी डोस देण्यात आला आहे. 

आयसीएमआरकडून आलेल्या सूचनेनुसार नायर रूग्णालयात एकूण 125 जणांना कोव्हिशील्डचा पहिला डोस देण्यात येणार होता. त्यामुळे, आणखी अतिरिक्त 25 जणांना पहिला डोस दिला जाणार आहे. त्यासोबतच कालावधी पूर्ण झालेल्या स्वयंसेवकांना मंगळवारपासून डोस दिला गेल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. 

28 सप्टेंबरला नायरमध्ये तीन स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डची लस देण्यात आली होती. स्वयंसेवकांचा 4 महिन्यांचा पाठपुरावा केला जाईल. या अभ्यासाचा संपूर्ण कालावधी सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत असणार आहे.

केईएममध्ये 14 जणांना डोस - 

केईएममधील स्वयंसेवकांना २६ ऑक्टोबरपासून दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 14 जणांना कोव्हिशील्डचा दुसरा डोस देण्यात आला आहे अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

corona vaccine update second dose given to 20 healthy people in KEM and Nair hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT