corona sakal media
मुंबई

प्रतीक्षा संपली; कोरोना व्हेरियंट शोधणारी 'ही' मशीन मुंबईत दाखल

भाग्यश्री भुवड

मुंबई : बहुप्रतिक्षित जिनोम सिक्वेंसिंग मशीन (Genome Sequencing Machine) अखेर मुंबईत (Mumbai) दाखल झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिंगापूरमधील (Singapore) मालवाहू विभागात (Cargo) अडकलेल्या जिनोम सिक्वेंसिंग मशीनसाठी मुंबई महापालिका (BMC) पाठपुरावा करत होती. अखेर ही मशीन मंगळवारी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दाखल झाली आहे. ( corona variants searching Genome Sequencing machine available in Mumbai finally-nss91)

कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाचा म्हणजे नवीन प्रकारचा शोध घेणारे यंत्र अखेर मंगळवारी मुंबईत दाखल झाले. सीमाशुल्क मंजुरीनंतर ( कस्टम क्लीयरेंस) हे मशीन गुरुवारी पालिकेच्या ताफ्यात दाखल होईल. दोन दिवसांच्या चाचणीनंतर, जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कस्तुरबा रुग्णालयात सुरू होईल. ही प्रयोगशाळा सुरु झाल्यानंतर पालिकेला जीनोम सिक्वेंसिंगसाठी एनआयव्ही पुणे आणि चेन्नईच्या प्रयोगशाळेवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली असली तरी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिंता पालिकेला आधीपासूनच सतावत आहे. दरम्यान, कोरोना नवीन रूपांमध्ये बदलत आहे. कधी डेल्टा प्लस, तर कधी लॅम्बडा रूपे देश आणि जगभरात आढळत आहेत. या नवीन प्रकाराचा धोका टाळण्यासाठी पालिका कस्तुरबा रुग्णालयातील अत्याधुनिक प्रयोगशाळेत जीनोम सिक्वेंसींग चाचणी करणार आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मशीन मुंबईतील विमानतळावर दाखल झाली आहे. कस्टम क्लीयरेंस झाल्यानंतर ही मशीन पालिकेकडे उद्या किंवा परवापर्यंत दाखल होईल. दोन दिवसांच्या चाचणीनंतर ही प्रयोगशाळा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे कार्यरत होईल. काकाणी म्हणाले की, अल्मनिया कंपनीला सीएसआर अंतर्गत पालिकेकडे 6.5 कोटींची मशीन मिळाली आहे. परंतु, त्याच्या पायाभूत सुविधेचा खर्च पालिकेने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT