CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray Twitter
मुंबई

Corona wave: 'पालकांना अस्वस्थ नाही, तर आश्वस्त करा'

दीनानाथ परब

मुंबई: "कोरोना विषाणू विचित्र आहे. या विषाणूला ओळखण्याची जी लक्षणं आहेत. त्या व्यतिरिक्त काही वेगळं आढळलं. वेगळी साथ आढळली. त्याची सुद्धा दखल घेऊन माहिती प्रशासनाला कळवा. विषाणू (corona virus) कसा बदलेल, कुठे जाईल ते सांगता येत नाही. कुठेही दुर्लक्ष करु नका. ब्राझीलमध्ये इतरांपेक्षाही जास्त संसर्ग लहान मुलांमध्ये झालाय. आपण पालकांना घाबरवून टाकण्यासाठी नव्हे, तर घाबरु नका दिलासा देण्यासाठी ही बैठक होती" असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितले. (Corona virus third wave dont create panick in minds of parents give them confidance uddhav thackeray)

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बालरोग तज्ज्ञांनी मुलांमधील कोविड संसर्गासंदर्भात आशासेविकांशी संवाद साधला. "आशा सेविका लढवय्या आणि वीरांगणा असून कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगतानाच कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो" अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.

"बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सकडून ज्या सूचना मिळाल्या आहेत, त्याची अमलबजावणी करताना पालकांना अस्वस्थ करु नका, त्यांना आश्वस्त करा" असे उद्धव ठाकरे म्हणाले. "पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा विषाणू घरातल्या व्यक्तींपासूनच पोहोचला होता. त्यामुळे लहान मुलं घराबाहेर पडत नाहीत. त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातूनच विषाणू पोहोचू शकतो, त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या" असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

"कोरोनामुक्त गाव मोहिमेबद्दल लोकांना थोडस जागृत करणं गरजेचं आहे. कोरोना अबालवृद्ध ओळखत नाही. म्हणून आपल्या गावाची, आपल्या वस्तीची जबाबदारी घ्या. ग्रामसभा घ्या. आपण जे काही काम करताय, ते ऐकून मी थक्क झालो. महाराष्ट्राचं यश काय आहे तर त्याचे शिलेदार तुम्ही आहात. आरोग्य सुविधेची मूळ तुम्ही आहात" अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आशा सेविकांच्या कार्याचा गौरव केला.

या वेबिनारचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोग तज्ञांच्या टास्फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर आदी यावेळी उपस्थित होते.

या वेबिनारच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ‘आशा’ हा शब्द ज्याप्रकारे तयार झाला आहे त्याला साजेस काम आशा ताई करीत आहेत. कोरोनाचं संकट अजुनही टळलेलं नाही. महाराष्ट्र करीत असलेल्या कामाचं देशात, परदेशात कौतुक होत आहे. त्यासाठी तुमच्या कामाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT