मुंबई

धारावी पुन्हा एकदा हॉटस्पॉटच्या दिशेनं? माहिममध्येही सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ

भाग्यश्री भुवड

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्ण संख्या वाढत आहे. धारावीत कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. दरम्यान, धारावीपेक्षा माहिममध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. 

माहिममध्ये 122 सक्रिय रुग्णांची संख्या आहे. त्याच्या पाठोपाठ दादरमध्ये 91 आणि धारावीत 21 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान शनिवारी माहिमध्ये 8, धारावीत 07 आणि दादरमध्ये 03 रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 13954 पॉझिटिव्ह केसेसची नोंद या तिन्ही परिसरात झाली आहे. 

या तिन्ही परिसरातून 13 हजार 84 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईत चिंताजनक परिस्थिती

मुंबईत रुग्णवाढ सुरूच असून शनिवारी 897 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख18 हजार 207 झाली आहे. काल 571 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 99 हजार 6 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत मृत्यूदर मात्र अद्याप नियंत्रणात असून काल केवळ 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11 हजार  438 इतका झाला आहे. 

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर 371 दिवसांवर गेला आहे. कोविड रुग्णवाढीचा दर 0.19 इतका आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 31 लाख 17 हजार 294 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Virus Updates Mahim has more Corona active patients than Dharavi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT