मुंबई

यापुढे मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरील व्हेंडिंग मशिनमध्ये खाऊ नाही, तर मिळणार 'या' गोष्टी

पूजा विचारे

मुंबईः कोरोनानं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत सर्वाधिक या व्हायरसचा प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळाला. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही वाढताना दिसतो. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसंच नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रशासनानं मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. तसंच कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचाही वापर करण्यास सांगितलं आहे. मात्र एखाद्या वेळेस तुम्ही घरातून निघताना मास्क किंवा सॅनिटायझर विसरलात तरंच चिंता करु नका, कारण आतापासून मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर तुम्हाला या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी मध्य रेल्वे स्थानकात स्वयंचलित व्हेंडिंग मशीनमधून मास्क, सॅनिटायझर आणि हँडग्लोव्हज देण्याचा निर्णय घेतला आहे.  या व्हेंडिंग मशीनमधून तुम्हाला मास्क, सॅनिटायझर आणि हॅंड ग्लोव्हज  सहज उपलब्ध होणार आहेत. 

दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हे मास्क आणि सॅनिटायझर व्हेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  लवकरच ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,  लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर उपलब्ध होईल. याशिवाय 12 स्थानकांत हेल्थ एटीएमही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आरोग्य मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी दिलेल्या प्रवासाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रवाशांनी मास्क वापरावा, हातांची स्वच्छता, श्वसनाचे आरोग्य पालन केले पाहिजे. तसेच पर्यावरणीय स्वच्छता राखली पाहिजे. कोविड 19 प्रतिबंधात्मक साहित्य रेल्वेच्या आवारात प्रवाशांसाठी सहज उपलब्ध करुन देण्याच्याही सूचना आहेत. त्यानुसार स्वयंचलित व्हेंडिंग मशीनमधून हँडग्लोव्हज, सॅनिटायझर, मास्क नागरिकांसाठी उपलब्ध होणारेत. 

कसं काम करतं हे व्हेंडिंग मशिन 

इतर व्हेंडिंग मशीनप्रमाणेच हे मशीनही काम करतं. मशीनमध्ये पैसे टाका आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूचा कोड टाकून ती वस्तू मिळवा. या मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध असतील. तसंच एकदाच वापरता येणाऱ्या मास्कपासून ते एन 95 मास्कपर्यंत सर्व मास्क उपलब्ध होणारेत. याव्यतिरिक्त फक्त 50 ते 100 रुपयांमध्ये हँड सॅनिटायझरही मिळेल आणि ज्यांना ग्लोव्हज आवश्यकता आहे अशांना ग्लोव्ह्जही या मशिनमध्ये उपलब्ध होतील. 

सध्या दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हे व्हेंडिंग मशीन लावण्यात आलं  आहे. लवकरच इतर स्टेशनवरही असा व्हेंडिंग मशीनच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अशा प्रकारची योजना मुंबई रेल्वे प्रशासनाची असल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान प्रवाशांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी हेल्थ एटीएम किओस्क सुरु केलेत. सीएसएमटीसह वडाळा रोड, चेंबूर, पनवेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली आणि बदलापूर या रेल्वेच्या स्थानकांवर हेल्थ एटीएम बसवण्यासाठी ई-निविदा मागवण्यात आल्यात.

Corona virus Vending machine masks santisers gloves installed Mumbai Dadar central railway station

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

SCROLL FOR NEXT