Indian Doctors, nurses sakal media
मुंबई

लसीकरणात सहभागी झालेल्या डॉक्टर, नर्स यांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारताने आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा (corona vaccination) पार केल्यानिमित्त भाजप नेते व आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish shelar) यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार (Bandar west election ward) संघात लसीकरणात भाग घेतेल्या डॉक्टर (doctors), नर्स आणि कर्मचारी (nurse and employees) अशा २२५ जणांचा सत्कार (Honor) केला.

देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणात भाग घेतलेल्या कर्मचारी, डॉक्टर व नर्स यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे शेलार यांनीही वांद्रे पश्चिमेतील २२५ आरोग्य कर्मचाऱ्यांना पुस्तक, पुष्पगुच्छ व कृतज्ञता प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यामध्ये महिला संघ सभागृह (सांताक्रूझ), सुर्या हाँस्पिटल, रामकृष्ण मिशन रुग्णालय, जी. ए कुलकर्णी हायस्कुल, हार्मोनी लसीकरण केंद्र, बांद्रा भाभा रुग्णालय, जुना महापालिका दवाखाना (वांद्रे), होली फॅमिली रुग्णालय, रंगशारदा लसीकरण केंद्र आणि लिलावती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार आशिष शेलार यांनी केला. यावेळी स्थानिक नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला यांच्यासह भाजप विधानसभा अध्यक्ष किशोर पुनवत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT