MARUTI SUZUKI CARS
MARUTI SUZUKI CARS sakal media
मुंबई

जुलै महिन्यात कार विक्रीची धूम ! मारुती, हुंदाईचा आलेख उंचावला !

विनोद राऊत

मुंबई : कोरोनाची ओसरलेली लाट (Corona wave stops), शिथील झालेले निर्बध आणि अर्थव्यवस्थेत आलेली गती (economy increases) या कारणामुळे वाहन क्षेत्राने (Automobile industry) चांगलाच पिक-अप घेतला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या महिन्यात देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या कार विक्रीत (car sailing) चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात (July) मारुती सुझुकीने 36 टक्के तर हुंडाई मोटरने 25 टक्के जादा विक्रीची नोंद केली आहे. येणाऱ्या सण-उस्तवामुळे वाहन विक्रीत गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (Corona wave stops-economy increases-car sailing-Automobile industry-July month-nss91)

दुसऱ्या लाटेत वाहन क्षेत्रावर आलेली मंदीची मरगळ आता दूर होऊ लागली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कार उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने गेल्या वर्षाच्या तुलनेत या महिन्यात कार विक्रीत 101 टक्के एवढी वाढ नोंदवली आहे. कंपनीने जूनमध्ये 24,110 कार विकल्या तर जुलै महिन्यात कंपनीने 30,185 कार विक्री केल्या. हुंदाई मोटरने जूनमध्ये 40,496 कार विक्रीची नोंद केली तर जुलै महिन्यात कंपनीने 48,042 कार विकल्या. निसान, एमजी मोटर, स्कोडा या कंपन्यांनी कार विक्रीत चांगलीच वाढ नोंदवली आहे.

मारुती सुझुकीच्या सर्व प्रकारात वाढ

देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या सर्व वाहन सेंगमेंटमध्ये भरघोस विक्री नोंदवली केली आहे. आल्टो, एस प्रेसो या मिनी सेगमेंटमध्ये 19,685 कार विक्रीची नोंद झाली, गेल्या वर्षी याच महिन्यात 17,258 कारची विक्री झाली होती. कंपनीने वॅगन आर, स्विफ्ट, सेलारीओ, इग्नीस, बलेने, डिजायर या कॉम्पॅक्ट सेगमेंटमधील कार विक्रीत 36 टक्के वाढ नोंदवली आहे. जुलै महिन्यात एकुण 70,268 कारचा खप झाला , गेल्या वर्षी याच महिन्यात केवळ 51529 कार विकल्या गेल्या. तर यूवी सेगमेंटमधील विटारा ब्रीझा, एस क्रॉस, इर्टीगा या गाड्यांच्या खरेदीमध्ये तब्बल 68 टक्के एवढी वाढ झाली आहे. जुलैमध्ये कंपनीने तब्बल 32,277 गाड्या विकल्या, गेल्या वर्षी या महिन्यात केवळ 19,177 गाड्यांचा खप झाला होता. .

देशभरात अनेक राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध कमी झाले आहेत. त्याचा मोठा परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये वाहन विक्रीने एकदम वाढल्याचे वाहन क्षेत्रातील तज्ञ सांगतात. मे महिन्यात कोविड परिस्थितीमुळे अनेक कार उत्पादक कंपन्यांनी उत्पादन काही काळासाठी बंद ठेवले होते. त्यामुळे वाहन विक्रीने एकदम तळ गाठला होता.मात्र गेल्या दोन महिन्यात परिस्थितीत बदल झाला आहे.

चांगला मान्सून, स्थिरावणारी सुक्ष्म अर्थव्यवस्था आणि सुरक्षित प्रवास करण्याकडे ग्राहकांचा वाढला कल यामुळे प्रवासी वाहन खरेदीत सकारात्मक वाढ दिसून येत आहे. अस हुंदाई मोटर्सचे विक्री, मार्केटींग आणि सेवा विभागाचे प्रमुख तरुण गर्ग सांगतात. तर येणाऱ्या सण-उस्तवामुळे वाहन खरेदीतील तेजी कायम राहण्याची अपेक्षा होंडा कारचे उपाध्यक्ष राजेश गोयल यांनी व्यक्त केली आहे. मात्र वाहन क्षेत्रापुढे कोविड आणि या महिन्यापासून कारच्या वाढलेल्या किंमतीचे आव्हान कामय असल्याचे त्यांनी म्हटलयं.

कार विक्रीचा चढता आलेख

कंपनी – कार विक्री

मारुती सुझुकी

जुलै 2020 - 97,768

जुलै 2021- 1,33,732

हुंडाई मोटर

जुलै 2020- 38,200

जुलै-2021- 48,042

टाटा मोटर्स

जुलै 2020 – 15,012

जुलै- 2021- 30, 185

होंडा कार्स

जुलै 2020 – 1,398

जुलै- 2021 – 6,055

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT