कोरोनाचा विळखा आणखी आवळला; नव्या भागांत आढळताय रुग्ण 
मुंबई

कोरोनाचा विळखा आणखी आवळला; नव्या भागांत आढळताय रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाने अद्याप शिखर गाठले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, मागील अवघ्या आठ दिवसांत 1000 हून अधिक नव्या भागांत रुग्ण आढळले आहेत.

मुंबई महापालिकेने आतापर्यंत सुमारे 6000 हाय रिस्क व्यक्तींना क्वारंटाईन केले असून, एक लाख नागरिक घरातच एकांतात आहेत. आता नव्या वस्त्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. 
कोव्हिड-19 विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणांची संख्या 2 मे रोजी 1576 होती; मात्र 8 मे रोजी दुपारपर्यंत हा आकडा 2646 पर्यंत पोहोचल्याची माहिती महापालिकेने दिली.

झोपडपट्ट्यांमध्येही कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. 2 मेपर्यंत 903 झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले होते. 8 मे रोजी ही संख्या 1497 झाली आहे. साधारणत: तीन रुग्ण सापडल्यावर एखादी वस्ती,चा ळ किंवा इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली जाते. आता मुंबईत एक रुग्ण आढळल्यानंतर संबंधित ठिकाण सील केले जात आहे.

आलेख चढताच...
दिवस               प्रतिबंधित वस्त्या          एकूण रुग्ण 

  • 29 एप्रिल            1391                        9532
  • 30 एप्रिल            1459                       10,030
  • 2 मे                    1576                      10,905 
  • 8 मे                    2646                      13,287

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ मजुरांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT