jail jail
मुंबई

जेलमधील कैद्यांना कोरोनाची अप्रत्यक्ष मदत; वाचा सविस्तर

कोरोना प्रसाराच्या वेगात घट होत असली तरी काही ठिकाणी अपेक्षित कमी झालेला नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Coronavirus Second Wave) गंभीर स्थिती उद्धवली असताना कारागृहदेखील (Jail) त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे राज्यातील (Maharashtra) कारागृहामधून 542 कैद्यांना तात्काळ पॅरोल (Parole) अथवा जामीन (Bail) देण्यात आला आहे. कोरोनाची स्थिती सुधारण्यासाठी कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी (Social Distancing) उच्चस्तरीय समितीच्या शिफारसीनंतर (Recommendation) हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी राज्यभरातील कारागृहांमधून 10 हजार कैद्यांची पॅरोल अथवा जामिनावर सुटका (Freed) करण्यात आली होती. सध्या सुमारे 12 हजार कैद्यांचे जामिन अर्ज प्रलंबित (Waiting) आहेत. (Coronavirus Effect Criminals sent out for Parole or granted bail to maintain social distancing in jail)

26 मेपर्यंत 483 कैद्यांची जामिनावर तर 59 कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. उच्चस्तरीय समितीने 1 मे व 7 मेला याबाबत शिफारस केली होती. राज्यातील 46 कारागृहांमध्ये 24 हजार कैदी ठेवण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात त्यात 32 हजार 362 कैदी आहेत. म्हणजे अद्यापही राज्यातील विविध कारागृहांमध्ये 10 हजार 800 कैदी अधिक आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यात हीच संख्या 36 हजार 61 एवढी होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्याप्रमाणात केद्यांना पॅरोल व जामिनावर सोडण्यात आले होते. त्यानंतर संख्या जुलै 2020 मध्ये 26 हजारांपर्यंत कमी झाली होती. पण यावर्षी 11 मेपर्यंत राज्यातील कैद्यांची संख्या 34 हजार 733 वर पोहोचली. कोरोनाच्या दुस-या लाटेत सहा कैद्यांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कारागृहांमध्ये 24 विलगीकरण केंद्रही सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार आता कारागृहांमध्ये एखादा कैदी दाखल झाल्यास त्याला 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. तेथे त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येते. कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याला कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. लक्षणे नसल्यास त्याला कारागृहामध्ये ठेवण्यात येणार आहे. पण या नव्या उपाययोजनाच्या माध्यमातून संशयीत व लागण झालेल्या कैद्यांना इतर कैद्यांपासून वेगळे ठेवणे शक्य होणार आहे. राज्यातील 47 तुरुंगात आतापर्यंत तुरूंग प्राधिकरणाकडून 70 हजारांहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यातील कारागृहांमध्ये सध्या 212 सक्रिय कोरोना झालेले कैदी आहेत. एकूण चार हजार 23 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT