Medicine
Medicine system
मुंबई

मुंबईतून सुरू होती कोरोनावरील बनावट औषधांची 'ऑनलाईन' विक्री

अनिश पाटील

बोगस औषधं विकून फसविणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश

मुंबई: कोरोना काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधे व सोयी सुविधा पुरविण्याच्या नावाखाली लुबाडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशाच एका आंतरराज्यीय टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सिप्ला कंपनीचे डीलर असल्याची सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून बिहार राज्यातील आरोपींनी देशभरातील लोकांना फसवल्याचे उघड झाले आहे. बनावट औषध प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील १ जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. (Coronavirus Medicines online sale was going on From Mumbai Cyber Police arrested 6 people)

पोलिसांनी या प्रकरणी धनंजय रामबरण पंडित (22), श्रवण पासवान (29), धर्म जय कुमार प्रसाद (29), नितीश कुमार मिथिलेश कुमार (27) , सुमंत कुमार प्रसाद (26) आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी इतर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास लावून मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर , हैदराबाद इत्यादी ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे सांगत 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने औषधे, हॉस्पिटल,ऑक्सिजन बेड आदींचा मोठया प्रमाणात तुटवडा झाला होता. याचा गैरफायदा भामट्यांनी उचलून बऱ्याच ठिकाणी लोकांची फसवणूक केली. अशाच प्रकारे कांदिवली येथील डॉक्टर आबासो चव्हाण यांनीदेखील यातील आरोपींनी रेमडिसिव्हीर औषध देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक केली होती. त्यांनी या प्रकरणी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यातील आरोपींनी ट्विटर च्या माध्यमातून सिप्ला कंपनीचे डीलर असल्याचे भासवून रेमडिसिव्हीर औषध उपलब्ध करून देण्याबाबत जाहिरात केली होती.

डॉक्टर चव्हाण यांच्या नातेवाईकाला रेमडिसिव्हीर ची आवश्यकता असल्याने आरोपींनी त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना ऍडव्हान्स पैसे भरण्यासाठी सांगितले.त्यानुसार त्यांनी पैसे भरले मात्र त्यानंतर आरोपींनी डॉक्टर चव्हाण यांच्याशी संपर्क तोडला होता. या ऑनलाईन फसवणुकीचा तपास सायबर पोलिसांनी करत असताना अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक आरोपींनी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तांत्रिक तपास करून यातील आरोपी हे बिहार राज्यातील नक्षली भागात सायबर कॅफे चालवून अशा प्रकारे फसवणूक करीत असल्याचा उलगडा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT