मुंबई

काळजी घ्या! कोरोना विषाणूची आणखी तीन लक्षणं आली समोर

शर्वरी जोशी

मुंबई : चीनपासून उद्रेक झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण देशात हातपाय पसरले आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रत्येक जण शक्य होईल त्याप्रमाणे स्वत:ची काळजी घेत आहे. तर पालिका रुग्णालयांमध्येही मोठ्या संख्येने लसीकरण मोहीम राबवली जात आहे. कोरोना विषाणूची सर्वसाधारण लक्षणं आता सगळ्यांनाच ठावूक झाली आहेत. ताप येणं, थकवा, तोंडाची चव जाणं, वास न येणं ही कोरोनाची मूळ लक्षणं आहेत. मात्र, या लक्षणांमध्ये आता नव्या लक्षणांची भर पडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

'इंडिया. कॉम'नुसार,दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रत्येक जण हवालदिल झाला आहे. त्यातच आता कोरोनाची नवी लक्षणं समोर आल्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

१. डोळे लाल होणे -

चीनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, डोळे लाल होणं हे कोरोनाचं नवीन लक्षण आहे. यात डोळे लाल होऊन त्याला सूज येते. तसंच डोळ्यातून सतत पाणी येतं. विशेष म्हणजे कोरोनाचा जो नवा स्ट्रेन आहे त्याच्यातही  ही लक्षणं आढळून आली आहेत. जर हा विषाणू डोळ्यांच्या संपर्कात आल्यानंतर तो थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. हा विषाणू डोळ्यातील ocular mucous membrane च्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो आणि झपाट्याने शरीरात पसरतो.

२. ऐकू कमी येणे -

नव्या लक्षणांमध्ये आढळून आलेलं हे सर्वात मोठं लक्षण आहे. कारण, यामध्ये श्रवण क्षमतेवर परिणाम होतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कोरोना विषाणूमुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यात एकतर ऐकू येणं बंद होतं 

३. पोटाच्या तक्रारी -

नव्या लक्षणांमध्ये पोटदुखी किंवा पोटाचे विकार हे नवीन लक्षण समोर आलं आहे. यात पोट दुखणे,पोटात मुरडा येणे किंवा उलटी होणे या समस्या जाणवतात.

कोरोना विषाणूचे सर्वसामान्य लक्षणं

प्रचंड ताप येणे, कोरडा खोकला, थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे, हातापायांचा रंग बदलणे, श्वास घेण्यास अडचण येणे हे कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे आहेत.

दरम्यान,राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT