panvel municipal corporation
panvel municipal corporation google
मुंबई

खारघर : मालमत्ता करामुळे नगरसेवक अडचणीत

सकाळ वृत्तसेवा

खारघर : पनवेल महापालिका (Panvel Municipal Corporation) क्षेत्रातील गावात वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा पाठवण्यात आल्‍या आहेत; मात्र यावर निवडून दिलेले नगरसेवक काहीच बोलत नसल्‍याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नगरसेवकांची अवस्‍थाही इकडे आड, तिकडे विहीर अशी झाली आहे.

पनवेल महापालिका ( Panvel Municipal Corporation) अस्तित्वात आल्यानंतर ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीच्या दरानुसार मालमत्ता कर वसूल करण्यात येत होता. मात्र अचानक पाच वर्षांचा मालमत्ता कर भरण्याच्या नोटिसा महापालिकेकडून पाठविण्यात आल्‍या आहेत. पालिकेकडून केवळ घनकचरा गोळा केला जातो, तर बहुतांश गावांत सिडकोकडून पाणीपुरवठा होत आहे. गावात मलनिस्सारण वाहिन्यांसारख्या अनेक समस्या असताना पालिकेने मलनिस्सारण कर आणि लाभ असे दुहेरी तसेच रस्ता कर, तसेच पालिकेची शाळा नसताना पालिकेने शिक्षण कर आणि अग्निशमन सेवा पालिकेकडे नसताना देखील अग्निशमन करआकारणी करून पाच पट वाढीव मालमत्ता कराची नोटीस पाठवली आहे. ज्या नगरसेवकांना निवडून दिले, ते या विषयावर काहीच बोलत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

६८ गावांचा पालिकेत समावेश

पालिका अस्तित्वात आल्यावर जवळपास ६८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पालिकेकडून काही गावांत मालमत्ता कराची नोटीस पाठवल्यामुळे गावागावांत पालिकेच्या विरोधात सभा-बैठका सुरू झाल्या आहेत. याविषयी खारघरमधील नगरसेवकाकडे विचारणा केली असता, गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे; मात्र पालिकेने शिक्षण कर तसेच इतरही अनेक कर लावल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत,

ही वस्‍तुस्थिती आहे. पाच महिन्यांनी निवडणूक होणार आहे. निवडणुकीत विरोधक हा मुद्दा पुढे करणार, यात शंका नाही. त्यामुळे ग्रामस्थांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडला आहे.

"पालिकेने पाठवलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात खारघर आणि कोपरा गावात बैठक झाली आहे. वाढीव मालमत्ता करामुळे ग्रामस्थ नाराज असून येत्या दोन दिवसांत मुर्बी गावात मालमत्ता कराविषयी बैठक घेऊन ग्रामस्थ भूमिका स्पष्ट करणार आहेत."

- मनेश पाटील, ग्रामस्थ, मुर्बी गाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT