वरवरा राव 
मुंबई

वरवरा राव यांचा वैद्यकिय अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

सकाळवृत्तसेवा

मुंबई  : शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी कवी वरवरा राव (81) यांचा वैद्यकीय अहवाल दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नानावटी रुग्णालय व्यवस्थापनला आज दिले. तसेच, राव यांना भेटण्याची परवानगीही आज एनआयए आणि राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. व्हिडीओकाॅल किंवा काही अंतरावरून भेटण्यास हरकत नाही, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले. 

न्यायमूर्ती आर. डी. धनुका यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे आज सुनावणी झाली. येत्या तीन दिवसांत अहवाल दाखल करावा. त्यानंतर जामीनावर सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते वर्नन गोन्साल्विज यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा अहवाल शुक्रवारी येणार आहे, अशी माहिती एनआयएच्या वतीने देण्यात आली. 

सामाजिक कार्यकर्ते सुधा भारद्वाज यांनीदेखील जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. आज एनआयएने याला विरोध केला आहे. कारागृहांत भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेने आखून दिलेल्या नियमांनूसार सर्व सुरक्षा उपाय आहेत, असे एनआयएकडून सांगण्यात आले आहे. याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला आहे.

Court orders submission of medical report of Varvara Rao

( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेवर विमानतळाचे मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन! 'नोएडाला येण्यास आधीचे मुख्यमंत्री घाबरायचे'; अंधश्रद्धेचा पाढा वाचत पंतप्रधानांचा विरोधकांवर प्रहार

Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

Mumbai News :ठाणे पालिकेत गटार अन् पायवाटांमध्ये २५६० कोटींचा 'झोल'? नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा घणाघात; मालमत्ता वाटपातही २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : भिवंडीत गॅस लायटर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

“हा अनुभव शब्दात न मावणारा” कलर्स मराठीच्या नायिका तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक

SCROLL FOR NEXT