मुंबई

चार वर्षाच्या मुलीला माचीसचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार; न्यायालयाने ठोठावली २० वर्षांची शिक्षा

सुमित बागुल

मुंबई, ता. 8 : चार वर्षाच्या मुलीला माचीसचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन नराधम आरोपींना विशेष पॉक्सो न्यायालयाने दोषी ठरवून प्रत्येकी वीस वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा  ठोठावली आहे. आज मंगळवारी न्यायालयाने आपलं निकाल दिलाय. चार वर्षांची मुलगी तिच्याबरोबर झालेल्या अत्याचाराबाबत खोटे बोलू शकत नाही, असे निरीक्षण विशेष न्या.  संजश्री घरत यांनी नोंदविले आहे.

दोन वर्षांपूर्वी परळमधील आर ए के मार्ग पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली होती. पिडीत मुलगी आरोपींना दादा म्हणायची. मात्र तिचा गैरफायदा आरोपींनी घेतला. यामध्ये तीन आरोपी असून एक अल्पवयीन तर दोन 18 ते 20 या वयोगटातील आहेत. लहान मुलीच्या निष्पापपणाचा आणि विश्वासाचा गैरफायदा आरोपींनी घेतला त्यामुळे त्यांना दया दाखविणे योग्य नाही, असे निकालात म्हटले आहे.

अल्पवयीन आरोपीवर बाल न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलांना संरक्षण देण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पिडीत बालिकेने दिलेली जबानी न्यायालयाने ग्राह्य धरली आणि आरोपींना दोषी घोषित केले. मुलीच्या आईने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी महाविद्यालयात शिकत असून त्यांची ऑनलाईन परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच उच्च न्यायालयात अपील दाखल करु असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले.

court sentenced twenty years of imprisonment to two people under pocso

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT