मुंबई

आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीने दिली सर्वात मोठी गुड न्यूज, ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा झाला दोन अंकी...

सुमित बागुल

मुंबई : धारावी! मुंबईतील सर्वात दाटिवाटीचं ठिकाण, देशातील नव्हे तर संपूर्ण आशियाखंडातील सर्वात मोठी झोपडपडपट्टी. इथे एका खोलीत ६ ते ८ जण राहतात. वापरासाठी सार्वजनिक टॉयलेट्स. साधारण अडीच स्केवर किलोमीटरमध्ये वसलेल्या धारावीची अंदाजे लोकसंख्या आठ ते साडे आठ लाख इतकी. कोरोनाने धारावीत प्रवेश केला आणि मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला. यानंतर सुरु झालं झालं मिशन धारावी. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, अशात धारावीत अनेक लहानसहान उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आर्थिक राजधानीतील धारावीत कोरोना बॉम्ब फुटला असता तर मोठा गहजब मजला असता.

धारावी आणि सोबतच मुंबईचं टेन्शन झालं कमी  

एप्रिल महिन्यात मुंबईतील सर्वात दाटीवाटीच्या आणि गजबजलेल्या धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर धारावीत झपाट्याने कोरोना संसर्ग फोफावू लागला. एवढया कमी जागेत इतकी बिऱ्हाडं राहत असल्याने फिजिकल डिस्टंसिंग पाळणं केवळ अशक्य होतं. मात्र केंद्राच्या सोबतच राज्याचा आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका, विविध NGO आणि धारावीतील नागरिकांच्या सहकार्याने धारावीने कोरोनाला युद्धात मात दिल्याचं चित्र आहे. सध्या धारावीत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० च्या खाली म्हणजे केवळ ९९ इतकी आहे. धारावीतील एकूण २०८० रुग्णांनी कोरोनाला मात दिलीये आणि ते पुन्हा आपल्या घरी परतलेत.

कोरोनाच्या लढाईत राबवण्यात आलेल्या धारावी पॅटर्नची जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेतली, केन्द्रीय आरोग्य मंत्रालयानेही धारावीत राबवण्यात आलेल्या योजनांचं कौतुक केलंय. सध्या धारावीतील दररोजची कोरोना रुग्णवाढ ही केवळ १.१ टक्के इतकी आहे.  

'धारावी पॅटर्न' रोल मॉडेल

दरम्यान धारावीमध्ये ज्यापद्धतीने कोरोना नियंत्रणात आलाय तो पॅटर्न आता एक रोल मॉडेल पॅटर्न म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशभरात राबवला जातोय. मुंबई नजीकच्या कल्याण डोंबिवलीमध्ये धारावीसारखीच परिस्थिती निर्माण होतेय. म्हणून आता तिथेही धारावी पॅटर्न राबवला जाणार आहे.  

covid 19 best news comes from dharavi active patient count comes to 99 only

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT