मुंबई

Mumbai Hotspots: मुंबईतील 'हे' चार विभाग पुन्हा हॉटस्पॉटच्या दिशेने

मिलिंद तांबे

मुंबई: नियंत्रणात आलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. उपनगरातील 4 विभागात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून हे विभाग पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसते.

मुंबईत 1 फेब्रुवारी पासून लोकल ट्रेन सेवा सुरू झाली. लोकांची गर्दी वाढू लागली. परिणामी जानेवारी पर्यंत नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाढू लागली. के पूर्व (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी), टी  विभाग (मुलुंड), आर मध्य (बोरिवली), एम पश्चिम ( चेंबूर, टिळक नगर) या चार वॉर्डमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. या विभागांमध्ये रोज नवीन रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्के वाढत आहे. चेंबूर, टिळक नगर आणि मुलुंड या भागात रुग्ण संख्या वाढीचा दर सर्वाधिक 0.26 टक्के आहे. चेंबूरमध्ये सरासरी 20 रुग्ण आढळत असून मुलुंडमध्ये रोज सरासरी 40 रुग्ण आढळत आहेत.

मुंबईत रोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांची

संख्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 350 ते 400 होती. फेब्रुवारीपासून यात पुन्हा वाढ होऊन ही संख्या 500 वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर गुरुवारी आणखी वाढला असून आता हा दर 0.17 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या आठवड्याभरात हा दर 0.12 टक्के होता. त्या तुलनेत चार विभागांतील रुग्णवाढीचा दर अधिक आहे. गुरुवारी 736 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.

मुंबई महापालिकेने नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी रहिवासी इमारतींना नोटीसा देखील बजावल्या आहेत. मुंबईत सार्वजनिक ठिकाण, विवाह कार्यालये, बाजार, गर्दीची ठिकाणी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

इमारतीत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग करण्याच्या आणि कमीत कमी लोकांना इमारतीत प्रवेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पालिकेने एम वेस्ट वॉर्ड मध्ये 550 इमारतींना नोटीसा दिल्या आहेत. मुंबईत सध्या 258 इमारती सील आहेत. यांपैकी एन विभागात (घाटकोपर) मध्ये सर्वाधिक 107 इमारती सील केल्या आहेत. मुंबईत सध्या कंटेंटमेंट झोनची संख्या 57 आहे. 

वॉर्ड सक्रिय रुग्ण
   
आर मध्य- बोरिवली 431
के पूर्व-अंधेरी, जोगेश्वरी 359
टी विभाग - मुलुंड 311
एम पश्चिम-टिळक नगर,चेंबूर  185

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid 19 case mumbai increase four areas hotspots marked

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT