private covid centre closed due to lack of oxygen supply file photo
मुंबई

कोविड संदर्भात मुंबईकरांचं थोडं टेन्शन वाढवणारी बातमी

काय आहे कोविडचा ग्राफ?

दीनानाथ परब

मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रात बुधवारी कोरोना रुग्णांच्या (Corona patient) संख्येमध्ये वाढ झाली आहे. पण व्यापक स्तरावर पाहिलं, तर या रुग्णवाढीमध्ये मोठा फरक आहे. मागच्या दोन आठवड्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १८ टक्क्याने वाढली आहे पण महाराष्ट्रात रुग्णवाढीचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटले आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय (second wave) असे आता आपण म्हणू शकतो. सणासुदीचे दिवस असूनही कोविडचा आलेख स्थिर आहे, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे ते सदस्य आहेत.

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये १०० पेक्षा कमी रुग्ण आहे. नंदुरबार आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी २,२१९ कोरोना रुग्ण आणि ४९ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ५,९०० पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रातील एकूण (२९५५५) कोरोना रुग्णांपैकी एक पंचमांश रुग्ण मुंबईतील आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी तितकी गंभीर स्थिती नाहीय असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसऱ्या लाटेत तीन एप्रिलला मुंबईत सर्वाधिक ११,०२० कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कोविड संदर्भात चर्चा झाली.

तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण नागरिकांनी मोठ्या संख्येने कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतल्यामुळे आता तिसऱ्या लाटेची शक्यता धुसर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सध्या मुंबईत कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मॉल आणि लोकल ट्रेनमध्ये प्रवेश दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT