Ganesh Festival  sakal media
मुंबई

मुंबई : गणेश विसर्जनासाठी नियमावली जाहीर; जाणून घ्या...

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मुंबईतील गणेश विसर्जनासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिका आणि गणेश मंडळांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सार्वजनिक मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच चौपाट्यांवर गणेश मूर्तीचं विसर्जन करता येणार आहे.

मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची सोमवारी (दि. २३) बैठक पार पडली. या बैठकीत विसर्जन मिवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, चौपाट्यांवर गणेश मूर्तीचं विसर्जन करता येणार आहे. गणेश उत्सवाबाबत या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.

असे असतील विसर्जनाबाबतचे नियम

  1. चौपाट्यांवर विसर्जनासाठी १० कार्यकरर्त्यांनाच परवानगी

  2. गेल्या वर्षीप्रमाणंच यंदाही सार्वजनिक गणेश उत्सवाचे नियम लागू राहणार.

  3. सार्वजनिक उत्सवासाठी गणेश मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती गणेशाच्या मूर्तीची उंची दोन फूट असेल.

  4. गर्दी होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यायची आहे.

  5. मुंबई महापालिका ८४ ठिकाणं विसर्जनाची सोय उपलब्ध करुन देणार.

  6. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती सुपूर्द करावी लागणार. मंडळाच्या कार्यकर्त्यांना थेट मूर्ती विसर्जन करता येणार नाही.

  7. मोठ्या गणेश मंडळांची मागणी होती की, कृत्रीम तलावांच्या ठिकाणी विसर्जन करणं कठीण जात असल्यानं आम्हाला चौपाट्यांवर किंवा नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्यात यावी, ही मागणी बैठकीत मान्य करण्यात आली आहे.

  8. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT