मुंबई

कोरोना लढाईतील पुढचं पाऊल, कोविशील्डची चाचणी आता ज्येष्ठ नागरिकांवर

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनावरील कोविशील्ड लसची चाचणी मुंबई महापालिकेच्या नायर तसेच केईएम रूग्णालयात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात या चाचण्या 18 ते 60 वर्षा दरम्यानच्या स्वयंसेवकांवर करण्यात आल्या. आता 60 वर्षावरील स्वयंसेवकांचा यात समावेश करण्याचे निर्देश ( ICMR ) आयसीएमआरकडून देण्यात आले असल्याने चाचणीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा सोध सुरू झाला आहे. 

नायर रुग्णालयात आजपर्यंत 148 जणांना कोविशील्ड लस देण्यात आली. चाचणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असून आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. चाचणीसाठी सुरुवातीला  18 ते 60 वर्षा दरम्यानच्या नागरिकांना ही लस देण्याचे आयसीएमआरचे निकष होते. मात्र आता ज्येष्ठ म्हणजेच 60 वर्ष वयोगटातील नागरिकांचा यात समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केईएम रुग्णालयात कोविशील्डचा तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग सुरू झाला आहे. नायर रुग्णालयात आजतागायत 148 स्वयंसेवकांना लस देण्यात आली. हे स्वयंसेवक सुदृढ असून त्यांच्या तब्येतीवर कोणताही विपरित परिणाम झाला नसल्याचे नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. शिवाय आता आयसीएमआरच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करणार असल्याचे ही भारमल यांनी पुढे सांगितले.

कोविशील्ड या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीवर केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात केईएम आणि नायर रूग्णालयातील 100 स्वयंसेवकांना लस देण्यात आली. मात्र, नायर रुग्णालयातील स्वयंसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 100 ऐवजी 125 जणांना लस देण्यात येणार आहे.  त्यासाठी उर्वरीत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. नायरमध्ये आतापर्यंत 148 जणांना लस देण्यात आल्याचे डॉ.रमेश भारमल यांनी सांगितले.

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे

ज्येष्ठ नागरिकांना समावेश चाचणीसाठी करण्यात येतोय. या लसीमुळे या आजाराला प्रतिबंध होतो का , श्वशनासंबंधी आजार कमी होतात का याचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी उच्च रक्तदाब, मधूमेह, क्षयरोग, कर्करोग आदी आजार नसलेल्या स्वयंसेवकांची गरज असते. व्याधीमुक्त ज्येष्ठ नागरिक शोधणे सुरू असून त्यासाठी प्रशासनाची दमछाक सुरू असल्याचे कळते.  

covishield vaccine testing in third phase senior citizens will be given dose in KEM and nair

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT