मुंबई

गोयल मुंबईद्रोही असल्याचा भाकपचा आरोप; महिलांना लोकल प्रवास नाकारल्याने गंभीर प्रतिक्रिया 

प्रशांत कांबळे

मुंबई ः मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्‍सप्रेस सुरू करण्यासाठी स्वतः रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गोयल यांनी तसे ट्विटसुद्धा केले आहे. मात्र, राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय महिलांना लोकलची सुविधा देता येणार नसल्याचे रेल्वेने राज्य सरकारला कळवले आहे. त्याबाबत गंभीर प्रतिक्रिया व्यक्त होत असून पियुष गोयल मुंबईद्रोही असल्याची टीका भाकपचे सरचिटणीस कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी केली आहे. 

राज्य सरकारने 17 ऑक्‍टोबरपासून मुंबई लोकलमध्ये महिलांना दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत व रात्री 7 वाजल्यानंतर प्रवासाची परवानगी द्या, असे पत्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेल्वेला पाठवले होते. त्यावर पूर्व नियोजन आणि रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय लोकल सुरू करण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारला पत्राद्वारे कळवले होते. त्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र, दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद जाणारी खासगी तेजस एक्‍सप्रेस 17 ऑक्‍टोबरपासूनच सुरू करणार असल्याचे गोयल यांनी ट्विट करून जाहीर केले आहे. 

गोयल यांचे हे कृत्य मुंबईतील नोकरदार कष्टकरी वर्गाच्या विरोधाचे आहे. महाराष्ट्र सरकारच्या विरोधाचे आहे. मुंबईत कामावर जाण्यासाठी प्रवाशांना चार चार तास प्रवास करावा लागतो. अतिरिक्त पैसेही खर्च करावे लागतात. जर तेजस एक्‍सप्रेस जर चालू होते, मेट्रो चालू होते तर महिलांसाठी लोकल का सुरू करता येत नाही? याचाच अर्थ पियुष गोयल हे खासगीकरणासाठी काम करत आहेत व राज्य सरकारची जाणूनबुजून अडवणूक करत आहेत, असा आरोप भाकपने केला आहे. राज्य सरकारची सूचना मान्य करून महिलांसाठी लोकल तात्काळ सुरू करण्याची मागणीही भाकपने केली आहे.

------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

मुलगी झाली हो...! कमळी मालिकेतील अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

Gaganyan Video : गगनयान अंतराळवीरांचा 'सुपरमॅन' मोड ऑन! व्हॉमिट कॉमेटमध्ये तरंगतानाचा व्हिडिओ व्हायरल

नवी मुंबईत ट्रॅफिकमुक्त प्रवासाचा मोठा निर्णय! तुर्भे उड्डाणपूल, डबल टनेल... वाहतूक कोंडीला ब्रेक लागणार

SCROLL FOR NEXT