मुंबई

पार्सल घेण्यासाठी थांबलेल्या महिलेवर कोसळली क्रेन, पश्चिम द्रुतगती महामार्गावर पहाटे भीषण अपघात

सुमित बागुल

मुंबई : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरी येथे हायवेनजीक एक अपघात झालाय. सकाळी 6 वाजता मेट्रोची एक क्रेन वांद्रेच्या दिशेने येत असताना गुंदवली बस स्थानकाजवळ आदळली.  या क्रेन चालकचे नियंत्रण सुटून सदर बस स्टॉपला आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, क्रेनचे दोन तुकडे झाले आणि त्यातील एक भाग थेट बस स्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर कोसळला. या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार फाल्गुनी पटेल असं या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेसोबत आणखी 3 जण या भीषण अपघातात जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

आज सकाळी सहा वाजता हा भीषण अपघात झालाय. सदर मृत महिला पार्सल घेण्यासाठी गुंदवली बस स्टॉपवर उभी असल्याची माहिती मिळतेय. त्याचवेळेला मेट्रोच्या कामाची क्रेन रस्त्यावरून जात असताना तिचा बस स्टॉपवर आदळून अपघात झाला. दुर्दैवाने क्रेनचा काही भाग अंगावर कोसळल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात आणखीन तिघे अधिक काही रिक्षांचे देखील नुकसान झालेले आहे.

crane crashed to the bus stop at western express highway one lady died in accident

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT