मुंबई

नवी मुंबईत ऑनलाईन समस्येवर उपाय; आता कृतिशील शिक्षणावर भर

सुजित गायकवाड

नवी मुंबई : ऑनलाईन शिक्षणामुळे डोळे चुरचुरणे, चिडचिड आदी आरोग्याच्या समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच इंटरनेट जाणे, स्मार्टफोनचा अभाव आदींमुळेही हे शिक्षण अडचणीचे ठरत आहे. त्यामुळेच नवी मुंबई महापालिका अशा शिक्षणाऐवजी कृतिशील शिक्षण पद्धतीवर आधारीत आभ्यासावर भर देणार आहे. रबाळे येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयाने स्वीकारलेला हा पॅटर्न आहे. 

वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आघाडीवर आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणामुळे तर या महापालिकेचे नाव देशात गाजले आहे. आता महापालिकेचा शिक्षण विभाग एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहे. कोरोनामुळे घरात असलेल्या विद्यार्थ्यांना फक्त ऑनलाईन शिक्षणावर विसंबून न ठेवता कृतिशील शिक्षण पद्धतीनुसार अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या पालकांमार्फत हे शिक्षण देता येणार आहे. तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी पाठवून शिक्षण देता येईल का, याचीही शिक्षण विभागातर्फे चाचपणी केली जात आहे. 

भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, सुलेखन आदी विषयांबाबत कसा अभ्यास करावा आणि विद्यार्थ्यांनी काय करावे याचे सखोल मार्गदर्शन देणाऱ्या कृतीपुस्तिकेचा आधार घेतला जाणार आहे. ही सर्व पाठ्यपुस्तके महापालिकेमार्फत 40 हजार पालकांना वाटप केली जाणार आहेत. पालकांकडून दररोज कॉल सेंटरमार्फत विद्यार्थ्यांच्या विकासाबाबत माहिती घेतली जाणार आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी अशा प्रकारच्या कृतिशील शिक्षण पद्धतीवर अगोदरच भर दिला आहे; मात्र गरिबांच्या मुलांना अशा पद्धतीने शिकवणारी नवी मुंबई महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरू शकते. 

कुणी राबवला हा पॅटर्न? 
माजी महापौर सुधाकर शिंदे त्यांच्या संकल्पनेतून कृतिशील शिक्षण पद्धती साकारली आहे. रबाळे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज या महापालिकेच्या शाळेत सोनवणे यांनी ही संकल्पना यशस्वरीत्या अमलात आणली आहे. त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची पाठ्यपुस्तके तयार करून तब्बल साडेचार हजारपेक्षा जास्त गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटप केली आहेत. सोनवणे यांनी तयार केलेला शिक्षणाचा नवा पॅटर्न आता नवी मुंबई महापालिका संपूर्ण शाळांना लागू करण्याचा विचार करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT