Dead Body Found esakal
मुंबई

Crime: साखरपुड्यानंतर समजलं त्याचे दुसरीकडे प्रेमसंबंध आहेत; तरुणीने उचलेले टोकाचे पाऊल

सकाळ डिजिटल टीम

Crime: साखरपुडा झाल्यानंतर तरुणाचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतरही लग्नासाठी तरुणाच्या कुटुंबीयांनी जबरदस्ती करून मानसिक त्रास दिल्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना शहापूरलगत असलेल्या वाफेपाड्यात शुक्रवारी (ता. २४) उघडकीस आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहापूरजवळील वाफेपाड्यातील तरुणीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी शहापूरजवळ असलेल्या चेरपोली येथील निखिल घोलप याच्याशी झाला होता. साखरपुडा झाल्यानंतर निखिलचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे पीडित तरुणीला समजले.

त्यानंतर पीडितेने निखिल, त्याचे वडील कैलास व काजल घोलप यांना लग्न करणार नसल्याचे सांगितले; मात्र निखिलसोबतच लग्न करावे लागेल, लग्न मोडल्यास समाजात तुमची बदनामी करू, अशी धमकी निखिलच्या आई-वडिलांनी देऊन पीडित तरुणीला मानसिक त्रास दिला.

या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार पीडितेच्या वडिलांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामुळे तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निखिल व त्याचे वडील कैलास व काजल घोलप यांच्याविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT