मुंबई

Crime: आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला; घटनेत १० पोलिस जखमी

Kalyan : महिला-पुरुषांनी पोलिसांवर दगडफेक केली

सकाळ डिजिटल टीम

Kalyan : कल्याणनजीक आंबिवली येथे असलेल्या इराणी वस्तीतील नागरिकांनी पुन्हा एकदा पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ८) मध्यरात्री २ च्या सुमारास घडली.

मध्यरात्री आरोपीला पकडण्यासाठी अंधेरी पोलिसांचे एक पथक खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वस्तीत दाखल झाले. पोलिसांचे पथक दाखल होताच इराणी वस्तीतील महिला-पुरुषांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात दहा पोलिस जखमी झाले आहेत.

या दगडफेकीत १० पोलिस जखमी झाले. रात्री अंधार असल्याने गोंधळाची परिस्थिती होती. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये महिला-पुरुषांचा समावेश आहे. या चोरट्यांमधील एकाला अटक करण्यात आली आहे, तर दोघे फरार झाले आहेत.

कल्याण पश्चिमेतील आंबिवली परिसरात इराणी वस्ती आहे. बुधवारी मध्यरात्री अंधेरी पोलिस ठाण्याचे काही पोलिस एका आरोपीच्या शोधात आले होते. त्यांच्यासोबत खडकपाडा पोलिस ठाण्याचे काही पोलिसही गेले होते. रात्री २ वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत असताना इराणी वस्तीतील महिला, पुरुष आणि चोरट्यांच्या नातेवाईकांनी दगडफेक सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT