crime death to get amount of insurance 3 accused in arrest esakal
मुंबई

Mumbai Crime News : विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मृत्यूचा बनाव; 3 आरोपी अटकेत

अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून दोन कोटी रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिवाजी पार्क पोलिसांनी नुकतीच अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून दोन कोटी रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिवाजी पार्क पोलिसांनी नुकतीच अटक केली.दिनेश टाकसाळे, त्याचा मित्र अनिल भीमराव लटके व विजय रामदास माळवदे अशी आरोपांची नावे आहेत.

आरोपीने विमा कंपन्यांकडे सादर केलेल्या बनावट कागदपत्रात अधिक उत्पन्न दाखवले होते. त्याबदल्यात दोन विमा योजना घेतल्या होत्या. याप्रकरणी एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केली.

एलआयसीच्या दादर शाखेतील अधिकारी ओमप्रकाश साहू यांच्या तक्रारीवरून मंगळवारी पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार करणे, फसवणूक, कट रचणे, फसवणुकीचा प्रयत्न आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस पथकाने तपास सुरू केला. पथकाने तपास करून दिनेश टाकसाळे, त्याचा मित्र अनिल भीमराव लटके व विजय रामदास माळवदे यांना अटक केली. आरोपी अभियांत्रिकी क्षेत्रात पदविकेचे शिक्षण घेतले असून ते अहमदनगरमधील रहिवासी आहेत. आरोपी दिनेशने 21 एप्रिल 2015 रोजी एलआयसीकडे दोन कोटी रूपयांच्या विम्यासाठी अर्ज केला होता.

त्याशिवाय त्याने साडेपाच कोटी रुपयांचा आणखी एक विमा काढला होता. त्यासाठी सादर केलेल्या बनावट कागदपत्रांमध्ये शेती व खानावळ यांच्या माध्यमातून वर्षाकाठी 34 ते 40 लाख रुपये स्वतःची मिळकत दाखवली होती. त्यानंतर 25 डिसेंबर 2016 रोजी रस्ते अपघातात गव्हाणवाडी, पुणे नगर रस्त्यावरील बेलवडी पोलीस ठाण्यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका तरूणाचा मृतदेह दिनेशचा असल्याचा दावा केला.

त्यासाठी तेथील पोलिसांकडे आरोपीचे तोतया आई-वडील उभे करण्यात आले.अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून गाडीचे चाक गेल्यामुळे त्याची ओळख पटवणे शक्य नव्हते. त्याच्याच आधारे आरोपींनी तो दिनेशचाच मृतदेह असल्याचे सिद्ध केले

त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे तोतया आई-वडिलांच्या माध्यमातून दोन्ही विम्याचे एकूण आठ कोटी रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला. पण फक्त दोन कोटी रुपयांचा अर्ज स्वीकारण्यात आला. यावेळी दिनेशच्या खऱ्या आईने आपला मुलगा जीवंत असल्याचे सांगितले.

तसेच दिनेशच्या वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाल्यामुळे दावा करण्यासाठी आलेले आई-वडील कोण? असा संशय विमा कंपनीला आला. याबाबत एलआयसीने केलेल्या तपासणीत दिनेश जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलआयसीने याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT