mobile Google
मुंबई

मुंबई: कॉलेजचा ऑनलाईन वर्ग सुरु असताना लागला पॉर्न व्हिडीओ

कॉलेजच्या मॅनेजमेंटने गंभीर दखल घेतली आहे.

सुरज सावंत

मुंबई: कोविडमुळे सध्या शाळा, कॉलेजेसचे ऑनलाइन वर्ग सुरु आहेत. शाळा-कॉलेजला जाणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थी घरातूनच ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहतात. हे असे ऑनलाइन वर्ग सुरु असताना, काही अज्ज्ञात आरोपींनी (unknown accused) अश्लील प्रकार केले आहेत. टेक्निकल मार्गाचा अवलंब करुन हे आरोपी ऑनलाइन वर्गात घुसखोरी करतात. विलेपार्ले (vile parle) येथील एका नामांकित कॉलेजच्या ऑनलाईन वर्गात (online class) अशी घटना घडली आहे. (crime happened in Mumbai vile parle college online class)

ऑनलाइन लेक्चर सुरु असताना एका अज्ञात सायबर हॅकरने यंत्रणा हॅक करून प्रवेश केला व पॉर्न व्हिडीओ लावला. याप्रकरणी कॉलेजच्या प्राध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन जूहू पोलिसांनी अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. जुहू पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संबंधित हॅकर्सचा शोध घेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सायबर बुलिंगसाठी काहीजण ऑनलाईन अश्लील कृत्य करणे, अश्‍लील संभाषण करणे, शिक्षकांना शिवीगाळ करणे असे प्रकार करीत आहे. केवळ मौजमजेसाठी असे प्रकार घडत असल्याचे काही प्रकरणातून उघडकीस आले आहे.

अलीकडेच साकिनाका येथे खाजगी क्लास सुरु असताना सायबर बुलिंगसाठी अश्‍लील कृत्य केल्याप्रकरणी राजस्थानच्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शाळा, कॉलेज आणि खाजगी क्लासेस बंद आहेत. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन शिक्षणावर अधिक भर दिला आहे. या घटनेची कॉलेजच्या मॅनेजमेंटने गंभीर दखल घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जलसाठ्यावर चिंतेचे ढग! सात तलावांत उरले फक्त १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Karnataka Politics : सिद्धरामय्यांची 'ती' एक चूक नडली! डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत शांतपणे कसा उलटवला डाव? वाचा कर्नाटकच्या नेतृत्वबदलाची Inside Story

"तो माजोरडा आहे" सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले "माझी भाषा अशीच आहे"

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

SCROLL FOR NEXT