मुंबई

Crime News: वाशीतील सुदामा सोसायटीतील स्लॅब कोसळल्या प्रकरणी फ्लॅट मालक व कॉन्ट्रक्टरवर गुन्हा दाखल!

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai News: वाशी सेक्टर-29 मधील सुदामा सोसायटीतील 202 क्रमांकाच्या फ्लॅटचा हॉलमधील स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळल्याची घटना घडल्यानंतर वाशी पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेला संबधीत फ्लॅट मालक व कॉन्ट्रक्टर या दोघांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

वाशी सेक्टर-29 मधील सुदामा सोसायटीतील 202 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम सुरु होते. सदर फ्लॅटच्या हॉलमध्ये नवीन लादी बसविण्यात येत असल्याने शुक्रवारी कामगार सदर फ्लॅट मधील जुन्या लाद्या काढण्यासाठी मोठया हातोडयाने टॉईल्स तोडण्याचे काम करत होते.

यामुळे सदर फ्लॅटच्या फ्लोरींगला हादरा बसल्याने सदर फ्लॅटचा पहिल्या मजल्यावरील स्लॅब पहिल्या मजल्यावरील 101 क्रमांकाच्या फ्लॅटवर कोसळला. सुदैवाने स्लॅब ज्या हॉलच्या ठिकाणी पडला, त्यावेळी तेथे कोणीही हजर नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात 202 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये सुशोभिकरणाचे काम चालू असताना कॉन्ट्रक्टर करण कुमार बिसवाल याने योग्य ती सुरक्षिततेची काळजी व दक्षता घेतली नसल्याचे आढळून आले. तसेच त्याने कामगारांच्या माध्यमातून मोठया हातोडयाने टॉईल्स तोडण्याचे काम केल्याने सदर फ्लॅट मधील फ्लोअरींगला हादरा बसून तो 101 क्रमांकाच्या हॉलमध्ये कोसळल्याचे आढळुन आले.

या प्रकारामुळे फ्लॅट क्रमांक 101 मध्ये राहणाऱया कुटुबियांची सुरक्षितता धोक्यात येऊन त्यांच्या घरातील किमंती वस्तूंचे नुकसान झाल्याचे आढळुन आल्याने वाशी पोलिसांनी फ्लॅट क्रमांक 201 चे मालक व कॉन्ट्रक्टर करण कुमार बिसवाल या दोघां विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, 23 ऑगस्ट 2023 रोजी नेरुळ सेक्टर-6 सारसोळे येथील तुलसी भवन या इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील स्लॅब खालच्या मजल्यावर कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 2 जण ठार तर 4 जण जखमी झाले होते.

तर 11 जून 2022 रोजी नेरुळ सेक्टर-17 मधील जिमी पार्क या सहा मजली इमारतीच्या ए-विंग मधील सहाव्या मजल्यावरील हॉलचा स्लॅब एकावर एक असे तळमजल्यापर्यंत पत्त्याप्रमाणे कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता, तर 7 जण जखमी झाले होते. यानंतर आता वाशीमध्ये स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT