Fraud
Fraud Sakal
मुंबई

Crime News : बँकेत 2000च्या बनावट नोटा बदलण्याचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक, आता...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शुक्रवारी 26 मे रोजी मुंबईतील ताडदेव परिसरातील एका खासगी बँकेत 2000 रुपयांच्या 10 बनावट नोटा बदलून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नवीद अशफाक शेख असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे.

शेख हा मोबाईलच्या दुकानात कार्यरत आहे. बँकेत नोटा बदलताना नोटा मोजणाऱ्या मशिनमध्ये बनावट नोटा आढळून आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी नोटांबद्दल आरोपीला माहिती विचारली असता तो समधानकरक उत्तर न देऊ शकल्याने त्याला बँक कर्मचाऱ्यांनी पकडले. 19 मे रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्भूमीवर ही घटना समोर आली आहे.

शुक्रवारी 26 मे रोजी दुपारी ताडदेव येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत नवीन शेखने 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेण्यासाठी जमा केल्या होत्या. शेख यांनी नोटा बदलताना माहिती देणारा फॉर्म भरला होता तसेच आधार कार्डची प्रतही सादर केली होती.

संशयाचे कारण म्हणजे नोटा मोजण्याचे मशीन नोटा स्वीकारत नसल्यामुळे हा पूर्ण घोटाळा उघडकीस आला. बँक अधिकाऱ्यांकडून ताडदेव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. ताडदेव पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे . याप्रकरणी ताडदेव पोलीस अशाच प्रकारे आरोपीने किती बँकांची फसवणूक केली आहे का या संदर्भात तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT