मुंबई

Crime News: खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; ४ गावठी पिस्टलसह इतकी काडतुसं केली जप्त

एक मॅगझीन व १८ जिवंत काडतुसे अटक केली. आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २५ एप्रिलपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Thane Crime: खंडणीविरोधी पथक, विशेष कृती दल, गुन्हे शाखा व युनिट पाचच्या यांच्या संयुक्त दोन ठिकाणच्या कारवाईत चार गावठी पिस्टल २२ काडतुसांसह एक मॅगझीन जप्त करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, याकरिता पोलिस प्रशासन सज्ज झाले असून पोलिस पथकांनी सराईत गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यातच खंडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलाला मिळालेल्या माहितीनुसार शंभू महतो नावाचा इसम गावठी क‌ट्टे विक्रीकरिता साकेत रोड, राबोडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे खंडणीविरोधी पथकाने साकेत रोड, राबोडी येथे गुरुवारी (ता. १८) सापळा रचत शंभू सुरेश महतो (वय ३५) याला चार पिस्टल, दोन गावठी कट्टे, एक मॅगझीन व १८ जिवंत काडतुसे अटक केली. आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २५ एप्रिलपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तर गुन्हे शाखेच्या दुसऱ्या कारवाई युनिट पाचच्या पथकाने वागळे इस्टेट रोड नं. १२ येथील नटवर हॉटेलसमोर गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत शेरबहादूर नवबहादुर कारकी, रा. चंडीगड यास विक्रीकरिता आणलेल्या दोन गावठी पिस्टल व चार काडतु‌सांसह अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT