baby patnkar  sakal
मुंबई

Crime News : कुविख्यात ड्रग्स तस्कर बेबी पाटणकरवर कोट्यवधीच्या फसवणुकी प्रकरणी गुन्ह्याची नोंद..गुन्हेशाखेकडे तपास वर्ग

5 किलो सोने देतो असे सांगून त्यांच्याकडून या दोघांनी रोख स्वरुपात 70 लाख आणि 1.28 कोटी रूपये आरटीजीएसच्या माध्यमातून हस्तांतरित केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - वरळीतील ड्रग्ज माफिया क्विन म्हणून कुप्रसिध्द असलेली शकुंतला उर्फ बेबी पाटणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळेस मुंबईतील व्यावसायिकाला सोने स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवून 1.97 कोटीची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बेबी पाटणकर हिच्यासह परशुराम मुंडे नावाच्या व्यक्तीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. बेबी पाटणकर सध्या मुंबईत असून लवकरच पोलसांकडून तिची चौकशी होणार आहे

वरळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2023 या दरम्यान गुन्हा घडल्याची माहिती मिळत आहे. आरोपी बेबी पाटणकर आणि तिचा साथिदार मुंडे यांनी कफ परेडमधील रुचिना फ्रेंच फॉरवर्ड या कस्टम क्लिअरन्स सर्व्हिस देणाऱ्या कंपनीचे मालक किरीट चौहान यांना स्वतात सोने देण्याचे आमीष दाखवले. आमिषाला बळी पडलेल्या चौहान यांना 5 किलो सोने देतो असे सांगून त्यांच्याकडून या दोघांनी रोख स्वरुपात 70 लाख आणि 1.28 कोटी रूपये आरटीजीएसच्या माध्यमातून हस्तांतरित केले.

परंतु पैशाची रक्कम स्विकारुन सुद्धा बेबी पाटणकरने सोने दिलेच नाही. तिला वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. अखेर चौहान यांनी वरळी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांची गुन्हेशाखा अधिक तपास करत आहे.

फसवणूकीचा प्लॅन..

चौहान यांनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी याबाबत काही व्यावसायिक मित्रांना आणि ओळखीच्या व्यक्तींना सांगितले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये देवकुमार रॉय नावाच्या व्यक्तीने त्यांची सुनीता चौधरी नावाच्या महिलेशी ओळख करून दिली. चौधरी यांनी परशुराम मुंढे नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. मुंढेने पुण्यातील आरआरएम गोल्ड ट्रेडिंग कंपनीचा संचालक असून त्यांची कंपनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले.

सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेले सोने लिलावात कमी भावात खरेदी करुन बाजार भावापेक्षा कमी भावात देतो असे आश्वासन दिले. त्याने चौहान यांना वरळी नाक्याजवळील भिवंडीवाला चाळीतील पहिल्या मजल्यावरील एका खोलीत सोने दाखवण्यासाठी नेले. तेथे बेबी पाटणकर उपस्थित होती. चौहान यांच्याशी बेबीची ओळख करुन दिली. बेबीने तिच्याजवळील एक किलो वजनाचे सोन्याचे 5 बार आणि 100 ग्रॅम वजनाची सोन्याची 15 बिस्किटे असे एकूण 6.5 किलो सोने दाखवले.

व्यावसायिक जाळ्यात

सोने पाहून चौहान तेथून बाहेर पडले. त्यांनी सोने खरेदीला होकार दिला. चौहान यांनी त्यांना रोख आणि आरटीजीएसच्या माध्यामातून 1.97 कोटी रुपये पोच केले. बेबी सोने घेऊन येते असे सांगून पैसे घेऊन तेथून निघून गेली. बराचवेळ वाट बघून ती न आल्याने चौहान यांनी तिला कॉल केला.

तिने झवेरी बाजार येथे भेटून सोने नेण्यास सांगितले. चौहान हे झवेरी बाजार येथे पोहचले. पण बेबी सोने घेऊन आलीच नाही. पूढे, बेबीची गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगून चौहान याना घाबरविण्यात आले. सोनेही मिळाले नाही आणि पैसेही गेल्याने अखेर चौहान यांनी पोलिसांत धाव घेत फसवणूकीची तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT