Murder   Murder photo
मुंबई

वर्सोवा समुद्र किनारी गोणीत आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

मुंबईच्या वर्सोवा येथील समुद्र किनारी एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईच्या वर्सोवा येथील समुद्र किनारी एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. साधारण: २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे वर्सोवाच्या चाय कॉफी चौपाटीच्या समुद्र किनारी परिसरात अनेकांनी गर्दी केली होती. गोणीतील महिलेच्या गळ्याला शरीराचे इतर भाग बांधण्यात आले होते. या धक्कादायक घटनेमुळे परिसरारत घबराहट निर्माण झाली आहे.

घटना अशी की, मुंबईच्या वर्सोवा येथील समुद्र किनारी एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळला आहे. २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत मिळाला आहे. गोणीतील महिलेच्या गळ्याला शरीराचे इतर भाग बांधण्यात आले आहेत. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी अधिकचा तपास सुरु केला होता. आता त्या मुलीची ओळख पटली असून अधिकचा तपास सुरु आहे. महिलेची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतून तो समुद्र किनारी आणला असल्याचा अंदाज पोलिसांना आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे. मुलीची ओळख पटली असून पोलिसांनी अधिकच्या तपासाला जोर धरला आहे. या घटनेमुळे मात्र या चौपाटी परिसरात नागरिकांत भितीचे वातावरण दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT