Crime sakal
मुंबई

Palghar Gang Rape : महाराष्ट्र हादरला! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी केला बलात्कार

पालघरमध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे

सकाळ डिजिटल टीम

पालघरमध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या 11 नराधमांपैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर 6 आरोपींचा शोध सातपाटी सागरी पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश आरोपी हे नशेच्या आहारी गेल्याचे माहिती देखील समोर आली आहे.

पालघर जिल्ह्यातील माहीम येथील पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीवर 11 तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या (नशेचा पदार्थ) आहारी गेल्याची माहितीही आहे. पीडित अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

ही सर्व आरोपी माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस त्यांचा तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT