Crime News 
मुंबई

Crime News : प्रियकराच्या मदतीने आईनेच केला पोटच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न !

सकाळ डिजिटल टीम

मुंबई, ता. ६ : प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेवर तिच्या पतीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी दहीसर पोलिसांनी निलम धाडवे आणि अक्षय गावड यांना अटक केली आहे.

पाच वर्षांच्या मुलाच्या शरीरावर भाजलेल्या खुणा असल्याचे दिसून आले आहे. त्याच्यावर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

निलम धाडवे ही दहिसर कोकणीपाडा परिसरात वास्तव्यास आहे. २०१९ पासून तिचा पतीसोबत वाद सुरू झाल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून पतीचे घर सोडून ती मुंबईत आली होती. पण, जून २०२३ मध्ये ती पतीकडून पाच वर्षांच्या मुलाला घेऊन आली. २८ सप्टेंबर रोजी महिलेच्या पतीला मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे फोन करून कळवण्यात आले होते.

महिलेच्या पतीने मुंबईला येऊन मुलाची अवस्था पाहिल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. आपल्या मुलाला पत्नी आणि तिच्या प्रियकराने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला; खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत बैठक

Maharashtra Latest News Live Update : मतदार याद्यांमध्ये घोळ होत असल्याची माहिती आयोगाला आधीच होती - जितेंद्र आव्हाड

Talegaon Local Train : मालगाड्या-एक्स्प्रेस धावतात, मग लोकल का नाही? पाठपुरावा करूनही रेल्वेमंत्र्यांच्या उत्तराने प्रवाशांचा संतप्त सवाल

Viral Video: बम बम भोले! भक्तिमय नृत्याचा व्हायरल व्हिडीओ, अनघा भगरेंनी केला शेअर

Amravati Crop Loss: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना विमाकवच नाही; पीकविमा योजनेतील ट्रिगर वगळल्याने शेतकऱ्यांना ठेंगा

SCROLL FOR NEXT