Crime News esakal
मुंबई

Crime News: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप; एक लाखाचा दंड

खटल्याच्या निकालाकडे पनवेल आणि तळोजा परिसरातील लोकांचे लक्ष लागून राहिले होते |People in Panvel and Taloja areas were riveted on the outcome of the case

Chinmay Jagtap, सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime : दहा वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱया नराधमाला पनवेल येथील विशेष सत्र न्यायाधीश शाहिदा शेख यांनी जन्मठेप व 1 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.(panvel)

शैलेंद्र लक्ष्मण सहानी (22) असे या नराधमाचे नाव असून मार्च 2016 मध्ये त्याने आपल्या शेजारी राहणाऱया 10 वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. सदर खटल्याच्या निकालाकडे पनवेल आणि तळोजा परिसरातील लोकांचे लक्ष लागून राहिले होते.

या घटनेतील नराधम आरोपी शैलेंद्र सहानी हा 2016 मध्ये तळोजा भागात राहण्यास होता. त्यावेळी त्याने आपल्या शेजरी राहणाऱया 10 वर्षीय पीडित मुलीला झांशी येथे पळवून नेले होते. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुध्द तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा व पीडित मुलीचा शोध घेतला असता, आरोपी हा पीडित मुलीसोबत झांशी रेल्वेस्टेशन येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी त्याला झाशी येथून पकडून आणले होते. त्यावेळी पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदविला असता आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले होते.(The police had arrested him from Jhansi)

त्यानंतर पोलिसांनी आरोपी शैलेंद्र सहानी याच्या विरोधात अपहरणासह बलात्कार व पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेष काळसेकर यांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करुन पनवेल येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरकारपक्षातर्फे एकुण 13 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीता, पिडीतेची आई हिची साक्ष तसेच डॉ.जया श्रीनिवासन व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेष काळसेकर यांची साक्ष महत्वाची ठरली.

सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रतिक्षा वडे वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद तसेच उपलब्ध साक्षी पुरावे ग्राह्य धरुन पनवेल येथील विशेष सत्र न्यायाधीश शाहिदा शेख यांनी आरोपी शैलेंद्र लक्ष्मण सहानी याला दोषी ठरविले होते.

त्यानंतर त्याला भा.द.वि. कलम 363, 366अ,376 (2) आय अन्वये जन्मठेप आणि 50 हजार रुपयांचा दंड, तसेच पोक्सो कायदा कलम 3 आणि 4 अन्वये जन्मठेप आणि 25 हजाराचा दंड, तसेच पोक्सो कायदा कलम 5 एम, पी, 6 अन्वये जन्मठेप आणि 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची 1 लाख रुपयांची रक्कम पिडीत मुलीला देण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बप्पा तुम्ही भाग्यवान.. कापनीच्या वेळी आलात'' पंकजा मुंडेंकडून बजरंग सोनवणेंना चिमटा

Modi-Shivraj Singh Chouhan : मोदींना पहिल्यांदा कधी भेटले होते शिवराज सिंह चौहान? जाणून घ्या, 'ती' खास आठवण!

Digital Panvel: ‘डिजिटल पनवेल’साठी पहिले पाऊल! महापालिका कार्यालयात किओस्क यंत्रणेचा वापर

Budhwar Peth Pune: तरुण बुधवारपेठेत गेला पण पैसे देताना पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, तीन महिलांनी असं काही केलं की....

10-20 करोड नाही तर सिडनी स्वीनीला बॉलिवूड फिल्मसाठी ऑफर केले इतके रुपये, ती सुद्धा झाली SHOCK !

SCROLL FOR NEXT