Mumbai Crime News  esakal
मुंबई

Mumbai Crime: रिक्षाच्या धडकेत विद्यार्थीनीचे दोन दात पडले; रिक्षा चालक घटनास्थळावरून फरार, पण...

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - रस्ता ओलांडणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थीनीला रिक्षाची धडक बसून जबर दुखापत झाली. त्यात तिचे दोन दात देखील पडल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

कल्याण पूर्वेतील हाजी मलंगगड रोडवर चेतना शाळेसमोर सोमवारी सकाळी हा अपघात झाला. घर दुरुस्तीसाठी लागणारे सामान खरेदी करुन ते हर्षदा वाघमारे ही 19 वर्षीय विद्यार्थीनी घरी जात होती. दरम्यान नांदिवली दिशेकडून चक्कीनाका दिशेने जाणाऱ्या रिक्षाने तिला जोरदार धडक दिली. (Latest Marathi News)

या धडकेत विद्यार्थीनीच्या हाता पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच तिचे दोन दात देखील पडले आहेत. या तरुणीला मदत करण्याऐवजी रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेला.

या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिक्षा वाहन क्रमांकावरुन पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT