मुंबई

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण:  ATSनं असा क्रिएट केला क्राइम सीन, वाचा सविस्तर

पूजा विचारे

मुंबई: भारतातले प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एटीएस आता तपास करत आहे. याच तपासाचा भाग म्हणून १० मार्च आणि ११ मार्चच्या रात्री ATS पथकाने मुंब्रा रेतीबंदर येथे 'क्राइम सीन'चे प्रात्याक्षिक करून पाहिले.
 
एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वेळी हे 'क्राइम सीन'चे प्रत्याक्षिक करण्यात आले. त्यावेळी घटनास्थळी ATS चे अधिकारी आणि न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे अधिकारीही उपस्थित होते. स्थानिक मच्छीमारांना समुद्रातील पाण्याचा अंदाज असल्याने पोलिसांनी हे प्रात्याक्षिक करताना त्याचीही मदत घेतली. हे प्रात्याक्षिक करण्यापूर्वी पोलिसांनी समुद्रातील भरती आणि आहोटी सांगणाऱ्या पालिकेच्या तज्ज्ञांचीही मदत घेतली. ज्या दिवशी मनसुखने आत्महत्या केली. म्हणजेच ४ आणि ५ तारखेला भरती आणि आहोटीची वेळ काय होती, हे पाहिलं. त्याप्रमाणे १० आणि ११ मार्चच्या मध्यरात्री भरती आणि आहोटीची वेळ सारखी असल्याने एटीएस पोलिसांनी या दिवशी 'क्राइम सीन' चे प्रात्याक्षिक केल्याचं सांगितलं जात आहे.

हिरेनचा हत्या झाली असल्याचा गुन्हा एटीएसनं घेतल्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरली. ज्याने कुणी हिरेनचा हत्या केली आहे. त्याने हिरेन यांना फेकताना, समुद्रातील भरती-आहेटीच्या वेळेची त्याला माहित नव्हती. त्यामुळे त्याचा असा समज झाला असावा की, समुद्रात बॉडी फेकल्यानंतर ती पुढे वाहून जाईल असा संशय पोलिसांना आहे. मात्र आरोपीने हिरेन यांचा मृतदेह फेकला. त्यावेळी आहोटी असल्याने त्यांचा मृतदेह हा पाण्यातून वाहून न जाता, गाळात रुतल्याचं सांगितलं जात आहे.

त्याचबरोबर त्या परिसरात सूत्रांच्या माहितीनुसार, मृतदेह सापडलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवनाचा झाडं आहेत. त्यामुळे मृतदेह वाहत पुढे जाणं शक्य नसल्याचं तेथील स्थानिकांच मत असल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आलं असल्याचं कळतंय. हा क्राइम सीन करण्यासाठी ATS पोलिसांनी  मनसुख हिरेन यांच्या वजनाचा आणि उंचीचा पुतळा बनवून तो फेकून गुन्ह्याचा अभ्यास केला. 

तर दुसरीकडे ATS च्या दुसऱ्या टीमने दक्षिण मुंबईतील एका गॅरेज मालकाचा जबाब नोंदवल्याचे कळतंय. पोलिसांना असा संशय आहे की, त्या स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचा चेसी आणि इंजिन नंबर हा त्या गॅरेजमध्ये खोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चेसी नंबर मोडल्या प्रकरणी ATS ने एका गॅरेज मालकाचा जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Crime scene created by ATS team at spot where Mansukh Hiren body was found

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT