पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई sakal
मुंबई

कल्याणात जुगार अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची धडक कारवाई

22 जणांसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण (Kalyan) पूर्वेतील तिसगांव नाका येथे तीन पत्ता जुगार खेळला जात असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली होती. गुरुवारी या अड्ड्यावर धडक कारवाई करत गुन्हे शाखेने 22 जणांसह 1 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस(Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोळसेवाडी परिसरात जरीमरी गेट समोर राजा शॉपिंग सेंटर या ठिकाणी तीन पत्ता जुगार खेळला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास मालरोटे, जोतिराम सांनूखे, पोलिस हवालदार राजेंद्र घोलप, निवृत्ती थेरे, प्रकाश पाटील, पोलिस नाईक सुरेश निकूळे, पोलिस शिपाई अजितसिंग राजपूत, विनोद चन्ने, राहुल ईशी यांच्या पथकाने राजा शॉपिंग सेंटर येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे 22 व्यक्ती हे जुगाराचा अड्डा खोलून तीन पत्ती जुगार खेळत व खेळवीत होते.

जुगाराच्या अड्ड्यावरून 78 लाख 455 रुपये रोख रक्कम, ताशचे पत्ते व इतर सामान असा एकूण 1 लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास दायमा यांच्या फिर्यादीवरून 22 जणांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT