Sameer Wankhede 
मुंबई

Cruise Party प्रकरणात एकूण १६ जण अटकेत; कसून चौकशी सुरु

या ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत एकूण १६ जणांना अटक झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईतून गोव्याला निघालेल्या कोडोलिया क्रूझवर अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) दोन दिवसांपूर्वी आर्यन खानसह तीन जणांना अटक केली होती. यानंतर आज १२ जणांना अटक करण्यात आली असून यांपैकी चार जणांना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली तर इतर चार जणांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. यामध्ये पार्टीचे आयोजन करणाऱ्यांपैकी चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या १६वर पोहोचली आहे.

एनसीबी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अब्दुल कादर अब्‍दुल कयूम शेख (वय ३०), श्रेयस सुरेंद्र नायर (वय २३), मनीष उदयराज दर्या (वय २६), अविन दिनानाथ साहू (वय ३०) या चौघांपैकी श्रेयसला काल रात्री उशीरा तर इतर तिघांना आज सकाळी अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना दुपारी १२.३४ वाजता जे. जे. रुग्णालय वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना स्थानिक कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली. त्यानंतर क्रूझमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन करणाऱ्यांपैकी चार जणांनाही एसीबीनं अटक केली.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना एनसीबीनं अटक केली असून ते सध्या ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Stock Crash: गुगलच्या शेअरमध्ये २० वर्षांतील सर्वात मोठी घसरण! का वाढलीय टेक कंपन्यांची चिंता?

"माझ्या जीवाला धोका" अभिजीत केळकर फेसबुक पोस्ट करत म्हणाला..."घरी आई-बायको अन् मुलं..."

Uttar Pradesh: ''उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा सत्ता द्या, UCC लागू करु'' केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates : पुण्यात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, विधान परिषदेच्या निकालावर मंथन?

Chakan MIDC: चाकण एमआयडीसीतील कामगारांना दिवाळी गिफ्ट! कुणाला ३० हजार, तर कुणाला ५५ हजारांचा बोनस

SCROLL FOR NEXT