arrested sakal media
मुंबई

पनवेल: अंमली पदार्थाच्या गोळ्यांची विक्री करणारा तरुण अटकेत

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : मेथॅम्फेटामाईन अमली पदार्थांच्या गोळ्यांची विक्री (Methamphetamine Drug tablet) करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला पनवेल तालुका पोलिसांनी (Panvel Police) सापळा रचून अटक केली. मुसा सुलतान खान (२६) (culprit arrested) असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १३ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ५३० गोळ्या (tablet seized) जप्त केल्या. धक्कादायक म्हणजे मुसा खान याने भारतातील बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार केले होते. पश्चिम बंगाल येथील बनावट जन्म प्रमाणपत्र (fake documents) तयार करून घेतल्याचे आढळून आले.

पनवेल तालुक्यातील आपटा फाटा, खारपाडा येथे एक बांगलादेशी नागरिक मेथॅम्फेटामाईन अमली पदार्थाच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर, उपनिरीक्षक संजय गवळे आणि पथकाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास सापळा लावला होता. यावेळी त्या भागात संशयास्पदरीत्या आलेल्या मुसा सुलतान खान याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली.

त्यावेळी त्याच्याजवळ तब्बल १३ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ५३० गोळ्या सापडल्या. मुसा खान याच्याकडे वसई, नालासोपारा येथील पत्त्यावरील भारतीय नागरिकत्वाचा पुरावा असलेले आधार कार्ड, आयकर विभागाकडून देण्यात येणारे पॅन कार्ड, पश्चिम बंगाल राज्यातील जन्म प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आढळून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT