Cyber-Crime
Cyber-Crime 
मुंबई

रस्त्यावरचे गुन्हे भविष्यात सायबरविश्‍वात अवतरणार!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - जागतिकीकरणाच्या युगात सर्व ऑनलाइन होत असताना बिटकॉइनमार्फत खंडणी मागण्यापर्यंत सायबर गुन्हेगारांची मजल पोहोचली आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्र ऑनलाइन जोडल्यास संगणकीकृत यंत्रणेचा वापर करून सायबर हत्या होण्याचीदेखील भीती आहे. हे लक्षात घेऊन संगणकीय यंत्रणा परिणामकारकरित्या सुरक्षित करणे गरजेचे असल्याचे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सुमारे पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत रुग्णालयाची संगणकीकृत यंत्रणा हॅक करून रुग्णाला द्यायच्या गोळ्या आणि वेळा बदलण्यात आल्या होत्या; पण डॉक्‍टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर तपासणीत मालवेअरच्या साह्याने रुग्णालयाची यंत्रणा हॅक करून हॅकरने हे घडवल्याचे निष्पन्न झाले होते. अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या पावलावर पाऊल टाकत प्रगती करू पाहणाऱ्या भारतातही भविष्यात असे प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

डेटा थेप्ट टाळणे गरजेचे
सायबर क्राइमच्या माध्यमातून देशाची व्यवस्था ढासळू शकते, इतकी त्याची व्याप्ती गंभीर स्वरूपाची आहे. साधारणत: सायबर गुन्ह्यांमध्ये पहिला टप्पा हा ‘डेटा थेप्ट’ करणे हा आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार अथवा हॅकर एखाद्या संगणकातील माहिती पेन ड्राइव्ह, डेटा बॅंक, सीडीचा वापर करून चोरतो. कॉर्पोरेट क्षेत्रात अशा स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडतात. आठ वर्षांपूर्वी मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत असाच प्रकार घडला होता. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला धमकीचा मेल पाठवत कंपनीशी संबंधित महत्त्वाची आणि गोपनीय माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला होता.

शिवाय खात्री पटावी म्हणून हा संपूर्ण डेटा एका संकेतस्थळावर सेव्ह करून त्याची लिंक मेलवर पाठवली होती. हा डेटा प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकू नये, म्हणून चोरी करणाऱ्याने ६४ हजार अमेरिकी डॉलर्सची (३८ लाख रुपये) मागणी केली होती. एकदा खंडणी दिली, की डेटा चोरी करणारे वारंवार पैशाची मागणी करत असतात, या भीतीने कंपनीच्या ‘सीईओ’ने तत्काळ मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर कक्षानेदेखील तत्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला होता; पण आता त्याची व्याप्ती वाढली आहे. बिटकॉइनमधील व्यवहारांमुळे खंडणी मागणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे.

साय-वॉरचे सावट
काही वर्षांपूर्वी झालेल्या अरब क्रांतीच्या वेळी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो फौजांनी अरब राष्ट्रांविरोधात सायबर हल्ल्याचा यशस्वी वापर केला होता. लीबियातील नागरिकांना भडकावण्यासाठी ‘नाटो’ने अनेकांना साय-वॉरचे प्रशिक्षण दिले होते. पुढे त्याच साय-वॉर प्रशिक्षितांपैकी काहींना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने आपल्याकडे वळवून घेतले. ईशान्य भारतीयांविरोधातील सायवॉर हे त्याच नाटो प्रशिक्षित व्यक्तींचे काम होते. भविष्यात आपल्याला अशा प्रकारच्या हल्ल्यांचाही सामना करावा लागणार आहे.

नजीकच्या काळात भारतात कॉर्पोरेट, व्यावसायिक आणि बॅंकिंग या क्षेत्रांमधील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्या यंत्रणांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्‍यकता आहे. आपल्याकडील रुग्णालये तंत्रज्ञाच्या साह्याने जोडली नसल्याने सायबर हत्येसारख्या घटना भारतात किमान १५ वर्षे तरी होणार नाहीत.  
- ॲड. विकी शहा, सायबरतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT