Dahisar River Sakal
मुंबई

मुंबई : दहिसर नदीचे आता रुप पालटणार

दहिसर नदीचे आता रुप पालटणार आहे. महानगर पालिकेच्या स्थायी समितीने आज दहिसर नदी जिवंत करण्याच्या प्रकल्पाला आज मंजूरी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दहिसर नदीचे आता रुप पालटणार आहे. महानगर पालिकेच्या स्थायी समितीने आज दहिसर नदी जिवंत करण्याच्या प्रकल्पाला आज मंजूरी दिली आहे. या प्रकल्पावर महानगर पालिका 281 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

महानगर पालिका प्रशासनाने ओशिवरा आणि दहिसर नदीच्या शुध्दीकरणासाठी 1 हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. यातील दहिसर नदीच्या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. नदीत येणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

दहिसर नदीत परीसरातील सांडपाण्यासह तबेल्यातील शेण मिश्रीत पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीचा नाला आहे. या नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, आता नदीला तीचे मुळ रुप देण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हे पंपिंग स्टेशन 15 वर्ष चालविण्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदाराची राहाणार आहे.

नदीत येणारे सांडपाणी अडविण्यासाठी 4 किलोमिटर लांबीच्या मलवाहीन्या, 1 किलोमिटर लांबीचे पोहच रस्ते आणि दोन मलजल केंद्र उभारण्यात येणार आहे. या मलजल केंद्रात रोज 6.5 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल.

म्हणून थांबवला ओशिवराचा प्रस्ताव

ओशीवरा नदीवरही असाच प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी 631 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. मात्र,आज हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला. या प्रस्तावाबाबत सदस्यांनी काही प्रश्‍न विचारले आहेत. त्या प्रश्‍नांची उत्तरे पुढील आठवड्यात बैठकीत सादर करण्यात येतील. त्यानंतर या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल असे जाधव यांनी सांगितले.

नदीमध्ये येणारे सांडपाणी अडवून त्याच्या प्रक्रिया करण्यात येणार आहे. हे प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा नदीत सोडण्यात येईल. त्यामुळे नदीचा प्रवाह बारमाही राहील. नदी तर जिवंत होईलच तसेच ते पर्यटन केंद्रही होईल. त्यासाठी बाजूने रस्तेही बनविण्यात येतील.

- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT