मुंबई

वाशीतील धोकादायक इमारती रडारवर 

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - मुंबईतील रेल्वेस्थानकाला जोडणारा पादचारी पूल गेल्या आठवड्यात कोसळला. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई पालिकेने वाशीतील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या जेएन वन आणि टू प्रकारातील इमारतींवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. रहिवाशांनी घरे सोडावीत याकरिता पाणी आणि वीज जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई ऐन परीक्षांच्या हंगामात सुरू होणार असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. 

राज्य सरकारने नेमलेल्या मिराणी, लिमये आणि घोसालिया समित्यांनी वाशीतील जेएन वन आणि प्रकारातील इमारती राहण्यास योग्य नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यानंतरही काहींनी या इमारती अतिधोकादायक नसल्याचे न्यायालयात सांगितले; परंतु बांधकाम परीक्षणातील अहवालातून या इमारती रहिवाशांना राहण्यायोग्य नसल्याची बाब अहवालातून उघडकीस आली. तेव्हा न्यायालयाने या इमारती रिकाम्या करण्याची जबाबदारी पालिकेवर दिली होती. तसेच दुर्घटना घडल्यास त्याला महापालिकेलाच जबाबदार धरले जाणार आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने या अतिधोकादायक इमारतींमधील नागरिकांना घरे सोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत; मात्र पर्याय नसल्याने रहिवासी घरे सोडत नसल्याने पालिकेने इमारतींची वीज आणि नळ जोडण्या खंडित करण्याचे काम सुरू केले होते; परंतु त्या दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने रहिवाशांच्या विनंतीनंतर परीक्षा संपेपर्यंत कारवाई करू नये, अशी भूमिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी घेतली होती. 

मुंबईतील सीएसएमटी येथील पादचारी पूल दुर्घटनेला अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आल्याने नवी मुंबईतही अतिधोकादायक इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास कारवाई होईल, या भीतीने प्रशासनातर्फे धोकादायक इमारती रिकामी करण्याची कारवाई सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

निर्णयासाठी आयुक्तांबरोबर बैठक 
पालिका आयुक्त रामास्वामी यांनी अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच एक बैठक घेतल्याचे समजले आहे. यात अतिधोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT